Nashik : खड्ड्यांवरून शिवसेना आक्रमक; आयुक्तांना निवेदन

Shivsena leaders giving statement to NMC commissioner.
Shivsena leaders giving statement to NMC commissioner.esakal

नाशिक : संततधारेमुळे वर्षभरात महापालिकेच्या रस्त्यांची चाळण झाल्याने कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचा आरोप करत शिवसेनेने (Shiv sena) आक्रमक भूमिका घेतली.

रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. पावसाची संततधार (Constant Rain) कायम असल्याने शहराच्या सर्वच भागात रस्त्यांची चाळण झाली आहे. (Shiv Sena aggressive on potholes giving Statement to NMC Commissioner Nashik Latest Marathi News)

अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे असून, त्यावरून वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. स्मार्टसिटी कंपनीची कामेही अर्धवट अवस्थेत असल्याने खड्ड्यांमधून मार्ग काढताना सर्वांनाच त्रास होत आहे.

वाहनचालकांसाठी रस्त्यांवरील खड्डे जीवघेणे ठरत आहे. मागील दोन वर्षात साडेसहाशे कोटी रुपये खर्च करून डांबरीकरण तसेच रस्ते दुरुस्त करण्यात आले. काही ठिकाणी नवीन रस्ते तयार करण्यात आली. शंभर कोटी रुपये देखभाल व दुरुस्तीवर खर्च झालेला आहे.

Shivsena leaders giving statement to NMC commissioner.
Crime Update : पाठलाग करून विनयभंग, मारहाण; गुन्हा दाखल

डिफेक्ट लायबिलिटी मुदत संपण्यापूर्वीच रस्ते खराब झाल्याने या सर्वांची चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. भविष्यात नाशिक शहर खड्डेमुक्त होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी, असे निवेदन उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

या वेळी माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी गटनेते विलास शिंदे, पूर्व विधानसभा प्रमुख योगेश बेलदार, पश्चिम विधानसभाप्रमुख सुभाष गायधनी, उपमहानगरप्रमुख नाना पाटील, विभागप्रमुख पवन मटाले आदी उपस्थित होते.

Shivsena leaders giving statement to NMC commissioner.
अखेर दैनंदीन वापरातील खादयपदार्थ व तृणधान्यावरील GST मागे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com