Latest Marathi News | पिसाळलेल्या कुत्र्याचा 6 जणांना चावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dog Attack

Nashik : पिसाळलेल्या कुत्र्याचा 6 जणांना चावा

एरंडगाव (जि. नाशिक) : येथे पिसाळलेल्या कुत्र्याने सहा जणांना चावा घेतल्याने गावात या कुत्र्याची दहशत पसरली आहे. शनिवारी (ता.२९) सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने एरंडगाव येथील वृद्ध महिला तसेच सहा ते सात लहान मुलांना चावा घेतला आहे. ( 6 people bitten by crushed dog at erandgaon nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik : कसारा घाटात कंटेनर दरीत कोसळला; चालकाला वाचवण्यात आपत्ती टीमला यश

यात येथील सेवानिवृत्त शिक्षक बबनराव पोटे यांची नात आरोही गांगुर्डे, इंदूबाई गायकवाड, साई गायकवाड, रोहित कापडणे, धनश्री आहेर हर्ष गाढे यांना गंभीर जखमी केले आहे. या सर्वांना येवला येथील रुग्णालयात दाखलव करण्यात आले आहे. कमी दुखापत झालेल्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाला दिली आहे. घटनेची माहिती पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण गायकवाड व पत्रकार सुनील गायकवाड यांना मिळताच तात्काळ धाव घेऊन रुग्णांवर योग्य त्या उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा: Anandacha Shidha : दिवाळी संपूनही 13 गावात मिळेना आनंदाचा शिधा

टॅग्स :NashikattackStray Dogs