अतिवृष्टीमुळे नाशिक विभागाच्‍या 60 बसफेऱ्या झाल्‍या रद्द | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSRTC latest marathi news

अतिवृष्टीमुळे नाशिक विभागाच्‍या 60 बसफेऱ्या झाल्‍या रद्द

नाशिक : अवघ्या एका दिवसाच्‍या विश्रांतीनंतर सोमवारी (ता. १८) शहरासह जिल्‍हाभरात पावसाने (Rain) हजेरी लावली. विविध भागांमध्ये झालेल्‍या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाच्‍या (MSRTC) नाशिक विभागांतर्गत सुमारे ६० बसफेऱ्या रद्द करावल्‍या लागल्‍या.

या बसफेऱ्या रद्द केल्‍यामुळे एसटी महामंडळाचे संभाव्‍य एक लाख दहा हजार रुपयांच्‍या उत्‍पन्नावर पाणी फेरले आहे. (60 bus trips of Nashik sections were cancelled due to heavy rain nashik rain Latest Marathi News)

हेही वाचा: 11th Admission : अर्जाचा भाग 2 भरण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून

गेल्‍या आठ ते दहा दिवसांपासून नाशिक जिल्‍ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. छोट्या-मोठ्या नद्या ओसंडून वाहत असून, लहान पूल पाण्याखाली गेल्याने गावागावांतील संपर्क तुटला आहे. यामुळे एसटी बस वाहतूकही प्रभावित झाली आहे.

रविवारी (ता. १७) पावसाने विश्रांती घेतल्‍यानंतर सोमवारी पुन्‍हा जिल्‍हाभर पाऊस पडला. यामुळे सायंकाळी सहापर्यंत एसटी महामंडळाच्‍या नियोजित ५९ फेऱ्या रद्द कराव्‍या लागल्‍या. पंचवटी आगारातील सर्वाधिक ३३ बसफेऱ्या रद्द झाल्‍या. त्‍यापाठोपाठ पेठ आगारातील १४ बसफेऱ्या रद्द झाल्‍या. या फेऱ्या रद्द झाल्‍याने एसटी महामंडळाचे संभाव्‍य एक लाखाचे उत्‍पन्नावर पाणी फेरले आहे.

हेही वाचा: गोदाकाठावरील पिकांची मोठी हानी; त्वरित पंचनामे करत नुकसानभरपाईची मागणी

Web Title: 60 Bus Trips Of Nashik Sections Were Cancelled Due To Heavy Rain Nashik Rain Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..