Rajya Natya Spardha : ‘तांत्रिक’ अडथळ्याने उत्कंठावर्धक ‘इथर’ प्रेक्षकांपर्यंत पोचलेच नाही

Artists of Sri Shiv Chhatrapati Sanskriti Kala and Krida Mandal CIDCO performing the play 'Ether' in the Maharashtra State Amateur Marathi State Drama Competition on Sunday.
Artists of Sri Shiv Chhatrapati Sanskriti Kala and Krida Mandal CIDCO performing the play 'Ether' in the Maharashtra State Amateur Marathi State Drama Competition on Sunday.esakal

नाशिक : विषय गूढ, गंभीर असला तरी सहज, सोप्या मांडणीतून तो यशस्वीपणे सादर करता येतो. मात्र अशावेळी सादरीकरणात तांत्रिक बाबींवरही अधिक भर द्यावा लागतो. अन्यथा चांगला विषय अन्‌ तितकीच कसून तयारी केलेली असतानाही नाटक प्रेक्षकांच्या गळी उतरत नाही, याची प्रचीती ‘इथर’ नाटकाच्या निमित्ताने आली. (61 Rajya Natya Spardha Technical hurdle never reaches exciting play Ether to audience Nashik News)

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या ६१ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रविवारी (ता. २०) सिडकोतील श्री शिवछत्रपती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळातर्फे राजेंद्र पोळ लिखित ‘इथर’ हे नाटक सादर झाले. चंद्रवदन दीक्षित यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात स्वतः श्री. दीक्षित यांच्यासह नीलम पानपाटील यांनी भूमिका साकारल्या. एका प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञाकडून एका प्रख्यात व्यक्तीच्या मुलीवर सुरू असलेले उपचार आणि उपचार यशस्वी होण्याऐवजी मानसोपचारतज्ज्ञातच होणारे बदल टिपणारे अत्यंत उत्कंठावर्धक कथानक असल्याने हे नाटक यापूर्वीच बऱ्यापैकी गाजलेले आहे.

त्यातही स्पर्धेतील प्रयोग असल्याने सादरीकरणाचे बारकावे कसोशीने पाळले जाणे अपेक्षित होते. मात्र काही तांत्रिक त्रुटींमुळे प्रेक्षकांचा व्हायचा तो रसभंग झालाच. याला मुख्य कारण ठरली ती ध्वनिव्यवस्था! श्री. पोळ यांची संहिता दमदार असली आणि श्री. दीक्षित यांनी दिग्दर्शनात भरपूर मेहनत घेतली असली, तरी ध्वनिव्यवस्थेवर ते विशेष लक्ष देऊ शकले नाही. चैतन्य गायधनी यांची प्रकाशयोजना बऱ्यापैकी प्रभावी होती.

Artists of Sri Shiv Chhatrapati Sanskriti Kala and Krida Mandal CIDCO performing the play 'Ether' in the Maharashtra State Amateur Marathi State Drama Competition on Sunday.
Swami Narayan Temple : सुटीचे औचित्य साधत स्वामी नारायणाच्या दर्शनास लोटली गर्दी!

मात्र मनीषा गायकवाड यांना रंगभूषा आणि भारती दीक्षित व पायल जाधव यांना वेशभूषा साकारण्यासाठी पुरेसा वाव मिळाला नाही. किशोर अंबोरे, सुनील दीक्षित व समीर जोशी यांनी मिळून सजविलेले नेपथ्यही बऱ्यापैकी होते. मंडळाला सादरीकरणासाठी प्रदीप डोंगरे, विक्रम गवांदे, श्रीकांत बेणी, भानुदास शौचे व नीलेश जाधव यांचे सहकार्य लाभले.

आजचे नाटक

स्पर्धेत सोमवारी (ता. २१) सायंकाळी सातला संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे ‘चांदणी’ हे नाटक सादर होणार आहे. या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक रोहित पगारे आहेत.

Artists of Sri Shiv Chhatrapati Sanskriti Kala and Krida Mandal CIDCO performing the play 'Ether' in the Maharashtra State Amateur Marathi State Drama Competition on Sunday.
Nashik : न्यायाधिश तेजवंतसिंह संधू यांनी न्याय करता करता जुळविल्या संसाराच्या गाठी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com