Rajya Natya Spardha : उपरोधिक मर्मभेदक विनोद ‘शीतयुद्ध सदानंद’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actors of Bosch Fine Art Institute presenting scenes from the play Shityudh Sadananda in the state drama competition

Rajya Natya Spardha : उपरोधिक मर्मभेदक विनोद ‘शीतयुद्ध सदानंद’

नाशिक : अकस्मात घडलेल्या एका घटनेतून पुढे जाताना अनेक प्रश्नांची होणारी निर्मिती अन् त्यातून तयार झालेली मानसिकता याचा पुरेपुर संदर्भ सांगणारी नाट्यकृती ‘शीतयुद्ध सदानंद’. ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धेत बॉश फाईन आर्ट्स तर्फे शीतयुद्ध सदानंद नाटक सादर झाले. श्याम मनोहर लिखित या नाटकाचे दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी केले. (61st haushi Rajya Natya Spardha Ironic poignant comedy in marathi play Shityudh Sadananda nashik news)

स्वातंत्र्योत्तर काळातील माणसाला पडलेले नैतिक प्रश्न हे नाटक उपस्थित करते. आधुनिकता आणि आत्मभान यातून निर्माण झालेल्या ताणाची अतिशय प्रभावी अशी अभिव्यक्ती या नाटकातून व्यक्त होते. जगण्यातल्या निरर्थकतेची अर्थपूर्ण जाण, आकलन आविष्कारातील बौद्धिकता आणि गांभीर्याने लिहिलेल्या उपरोधिक भाषेतून निर्माण होणारा मर्मभेदक विनोद हे या नाटकाचे वैशिष्ट्य.

एका अकस्मात घडलेल्या छोट्‌या घटनेतून नाटकाचा विषय पुढे जातो आणि जाता जाता अनेक प्रश्न निर्माण करतो. या नाटकातील सदानंदाला पहिलवानांनी ज्या प्रकारे खिंडीत गाठले आहे. त्यातून व्यक्तींना साधासरळ शहाणपणा नकोच असतो, हवा असतो एक माथेफिरू गुंता आणि पोकळ समाधान. समोर दिसणारी सृष्टी नीट पहिली तर शहाणपण येईल पण माणसाला पण माणसाला ते शहाणपणा हवाय की नकोय हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात या नाट्यकृतीने नक्कीच निर्माण केला.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Nashik News: नदीपात्रात शोधाव्या लागतात मोकळ्या जागा; नगररचना आराखड्यात जागा शिल्लक नसल्याचा परिणाम

सई मोने- पाटील, शंतनू विंचू, राजेंद्र चिंतावार, रचना चिंतावार, आनंद कुलकर्णी, श्रद्धा पाटील, किरण जाधव, मधुरा तरटे, आदिती मोराणकर, श्रीराम गोरे, गजेंद्र गुंजाळ, व्यंकटेश पवार, कल्पना सोनार, सोनाली काळे, सुधीर पोंदे, धनंजय गोसावी या कलावंतांनी या नाटकात भूमिका साकारल्या. चेतन बर्वे आणि कुणाल गुंडे यांनी नेपथ्य, तर प्रणव सपकाळ यांनी प्रकाशयोजना साकारली. पार्श्वसंगीत रोहीत सरोदे, संजय अडावदकर यांनी केले. रंगभूषा माणिक कानडे सचिन पाटील यांनी केली. अनिल कडवे, कशिश नोटानी यांनी वेशभूषा अन् केशभूषा साकारली. मुकुंद भट हे नाटकाचे निर्मितीप्रमुख असून, सेराफिन सुसैनाथन, धीरज साबणे आणि अमोल झणकर यांनी संयोजन केले.

आजचे नाटक

गुरुवारी (ता. १५) सायंकाळी ७ वाजता बाबाज थिएटर्स, नाशिकतर्फे सौभाग्यवती चिरंजीव हे नाटक सादर होणार आहे. अक्षय संत या नाटकाचे लेखक असून, आरती प्रभु हिरे दिग्दर्शक आहेत..

हेही वाचा: Garbage in city : शहरातील कचऱ्यात 10 टक्के वाढ!; रात्रीची 20 ठिकाणी घंटागाडी सुरू