esakal | जिल्‍ह्यात ६३ पॉझिटिव्‍ह ; ७१ कोरोनामुक्‍त, दोघांचा मृत्‍यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona updates nashik

जिल्‍ह्यात ६३ पॉझिटिव्‍ह ; ७१ कोरोनामुक्‍त, दोघांचा मृत्‍यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्‍ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव घटत असल्‍याचे आकडेवारीतून स्‍पष्ट होत आहे. मंगळवारी (ता. ५) जिल्‍ह्यात ६३ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर ७१ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली. दिवसभरात दोघा बाधितांच्‍या मृत्‍यूची नोंद आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात ९०१ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

मंगळवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील ३५, नाशिक ग्रामीणमधील २६, तर जिल्‍हाबाहेरील दोन रुग्‍णांना कोरोनाचे निदान झाले. दोन बाधितांच्‍या मृत्‍यूची नोंद असून, दोघे मृत नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत. जिल्‍ह्यात प्रलंबित अहवालांच्‍या संख्येत पुन्‍हा लक्षणीय वाढ झाली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत दोन हजार ९८० रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती.

यापैकी दोन हजार ६५५ नाशिक ग्रामीण, मालेगाव महापालिका क्षेत्रातील १८२, तर नाशिक महापालिका क्षेत्रातील १४३ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ४४९ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील ४४५ रुग्‍णांचा समावेश होता. जिल्‍हा रुग्‍णालय, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात एकही रुग्‍ण दाखल झाला नाही. नाशिक ग्रामीणमध्ये चार संशयित रुग्‍ण आढळले.

loading image
go to top