रमजानसाठी खजुराचे ६५ प्रकार उपलब्ध; २५ टन माल बाजारात

भारतापेक्षा अरब देशातून आलेल्या खजुराला रमजानच्या महिन्यात मोठी मागणी
Type of Dates
Type of Datesesakal

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : रमजान व उपवासाच्या दिवशी खजुराचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. लालसर आणि पिवळसर असलेल्या खजुराचे तब्बल ६५ प्रकार आहेत. सध्या पवित्र रमजान महिना सुरू असल्याने बाजारात खजूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. खजूर, पेंडखजूर, खारीक अशा विविध नावाने हे फळ ओळखले जाते. भारतापेक्षा अरब देशातून आलेल्या खजुराला रमजानच्या महिन्यात मोठी मागणी असते. पिंपळगावसह निफाड तालुक्यात रमजानच्या निमित्त २५ टन खजूर विक्रीसाठी आली आहे.

सलग दोन वर्षे कोरोनामुळे आखाती देशातून खजुराची आवक कमी झाली होती. यावर्षी बाजारात ६५ पेक्षा जास्त प्रकारचे आणि अगदी ६० रूपयांपासून एक हजार रूपये प्रतिकिलोपर्यत खजूर बाजारत उपलब्ध आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उलाढाल वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Type of Dates
Neha Malik : रमजानच्या पवित्र दिनी नेहा मलिकचा झक्कास लूक

रमजान (Ramadan) महिन्यात इफ्तारला खजूर खाऊन रोजा सोडला जातो. यामुळे पेंडखजुराला विक्रमी मागणी असते. विशेषता अरबी देशातून येणाऱ्या खजुराला अधिक पसंती मिळत आहे. ५० रूपयांपासून ६०० रूपये प्रति किलो विविध प्रकारची खजुराची विक्री होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. खजूर सेवन करण्यास धार्मिक व शास्त्रीय कारण आहे. निर्जल रोजा करताना शरीरातील थकवा नाहीसा करण्यासाठी असलेले जीवनसत्त्व यातून मिळते. मुस्लीम बांधवांकडून अजूनही ती संस्कृती जपली जात आहे. त्यामुळे रमजानमध्ये सर्वात पहिला कल खजूर खरेदीकडे असतो. सध्या विविध प्रकारचे खजूर बाजारात विक्रीस दाखल झाले आहे. ८० ते ६०० रूपये प्रती किलो खजूर विक्री होत आहे. यावर्षी महागाईमुळे किंचित दरांमध्ये वाढ झाली आहे. परंतु कोरोनानंतर समाजातील आर्थिक परिस्थित पाहता जुन्या दरानेच माल विक्री होत आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Type of Dates
रमजान: जाणून घ्या सहेरी आणि इफ्तारची वेळ ?

खजुराचे महत्त्वाचे प्रकार व प्रति किलो दर- आजवा (२०० रूपये किलो), कलमी (२५० रूपये किलो), इराण (६०० रूपये किलो), कियान (३०० रूपये किलो), मरियन (६०० रूपये किलो), सुक्री (५५० रूपये किलो), मेडझोल (१५०० रूपये किलो), मुझापती (५०० रूपये किलो).

खजूर खाण्याचे फायदे

शरीरातील थकवा घालवते, रक्ताचे प्रमाण वाढविण्यास मदत, पाण्याची कमतरता भरून काढते, नैसर्गिक साखर, लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअमचा शरीराला पुरवठा इत्यादी फायदे मिळतात.

"युध्दजन्य स्थितीमुळे खजुराची आवक कमी आहे. मात्र भाववाढ झालेली नाही. सर्वत्र महागाई वाढत असल्याने खजुराचे दर स्थिरावलेले आहेत, त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. अरबस्थामधून येणाऱ्या खजुराला अधिक मागणी आहे."

- तौफीक शेख, खजूर विक्रेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com