Nashik News : 4 उपनद्यांसह 67 नाल्यांना पुनर्वैभव! मुंबई IITचा मिठी नदीच्या धर्तीवर प्रकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IIT Bombay

Nashik News : 4 उपनद्यांसह 67 नाल्यांना पुनर्वैभव! मुंबई IITचा मिठी नदीच्या धर्तीवर प्रकल्प

नाशिक : मुंबईच्या मिठी नदीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी आयआयटीने पुढाकार घेतला, त्याच धर्तीवर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातून वाहणाऱ्या गोदावरीच्या चार उपनद्यांसह ६७ नैसर्गिक नाल्यांना पुनर्वैभव प्राप्त करून दिले जाणार आहे.

आयआयटीमार्फत लवकरच सर्वेक्षण करून त्या संदर्भातील तांत्रिक अहवाल सादर केला जाणार आहे. (67 Nalas with 4 tributaries reglorified Mumbai IIT project along Mithi River Nashik NMC News)

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याशी शुक्रवारी (ता. ६) आयआयटीच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. २००८ मध्ये मुंबईच्या मिठी नदीला पूर आल्यानंतर या नदीचे प्रदूषणाचे भीषण स्वरूप समोर आले. मुंबई महापालिकेने नदी स्वच्छ करण्यासाठी विविध प्रयत्न केले. त्यानंतर मुंबई आयआयटीकडून सर्वेक्षण करून मिठी नदी स्वच्छता कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

मिठी नदीच्या धर्तीवरच गोदावरी नदीच्या उपनद्यांनादेखील पुनर्वैभव प्राप्त करून दिले जाणार आहे. नमामि गोदा प्रकल्प तसेच स्मार्टसिटी कंपनीमार्फत सुरू असलेला ‘प्रोजेक्ट गोदा’ अंतर्गत गोदावरी नदीचे सुशोभीकरण व प्रदूषण मुक्ती केली जाणार आहे. परंतु नंदिनी, वालदेवी, वाघाडी व सरस्वती या चार उपनद्यांच्या दुरवस्थेचे चित्र बदलण्यासाठी ठोस उपाययोजना नाही.

त्यामुळे या उपनद्यांवर आता आयआयटीमार्फत काम केले जाणार आहे. मुख्यत्वे करून उपनद्यांमध्ये मिसळणारे सांडपाण्याचे नाले मलनिस्सारण केंद्राला जोडणे व उपनद्यांच्या काठी सौंदर्यीकरण करणे ही महत्त्वाची कामे केली जाणार आहे. कुंभमेळ्यापूर्वी काम पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Nashik News : बंदी उठवल्याने यात्रा-जनावर बाजार पूर्ववत

६७ नाल्यांवरही होणार काम

गोदावरी सह वालदेवी, नंदिनी, वाघाडी व सरस्वती या चार उपनद्यांमध्ये जवळपास ६७ सांडपाण्याचे नाले येऊन मिसळतात. सदरचे नाले प्रदूषण मुक्त करण्याबरोबरच मलनिस्सारण केंद्राला नाले जोडण्याचे नियोजन आहे. उपनद्या व ६७ नाले जोडण्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, या संदर्भात अद्याप स्पष्टता नाही.

"गोदावरी नदीला मिळणाऱ्या चार उपनद्या व ६७ नाले प्रदूषण मुक्त करण्यासाठी मुंबई आयआयटीच्या अधिकारी व विद्यार्थ्यांनी संपर्क केला आहे. आयआयटीमार्फत लवकरच सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर लवकरच कृती अहवाल तयार केला जाईल."
- डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, महापालिका.

हेही वाचा: CM Eknath Shinde Group : ठाकरे गटाला शिंदे गटाकडून सलग दुसरा धक्का!

टॅग्स :NashiknmcIIT mumbai