नाशिक जिल्‍ह्यात आज 677 पॉझिटिव्‍ह, 1 हजार 349 कोरोनामुक्‍त

Corona
Coronaesakal
Summary

गेल्‍या काही दिवसांपासून जिल्‍ह्यात लागू केलेल्‍या कठोर निर्बंधांचा परीणाम कोरोनाविषयक दैनंदिन अहवालात दिसू लागला आहे. सोमवारी (ता.24) जिल्‍ह्‍यात 677 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत.

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून जिल्‍ह्यात लागू केलेल्‍या कठोर निर्बंधांचा परीणाम कोरोनाविषयक दैनंदिन अहवालात (Corona Updates) दिसू लागला आहे. सोमवारी (ता.24) जिल्‍ह्‍यात 677 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. तर एक हजार 349 रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. 43 बाधितांच्‍या मृत्‍यूची नोंद आहे. ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत 715 ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात 15 हजार 244 बाधितांवर उपचार सुरु आहे. (677 corona positive patients found in Nashik district)

सोमवारी नाशिक महापालिका क्षेत्रात अपघ्या 316 रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला. तर नाशिक ग्रामीणमध्ये 350, मालेगाव महापालिका क्षेत्रात (Malegaon Municipal Corporation) अकरा रुग्‍णांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये सर्वाधिक एक हजार 122 रुग्‍ण नाशिक ग्रामीणमधील आहेत. नाशिक शहरातील 204 तर मालेगावच्‍या 23 रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. कोरोनामुळे झालेल्‍या मृतांमध्ये सर्वाधिक 21 मृत नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये सतरा तर मालेगाव महापालिका क्षेत्रात पाच बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे.

Corona
नाशिकमध्ये डेंगी रुग्णसंख्येवर नियंत्रण; 5 वर्षांत अंमलबजावणी

सायंकाळी उशीरापर्यंत जिल्‍ह्यातील दोन हजार 375 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार 184, नाशिक ग्रामीणमधील एक हजार 049 तर मालेगावच्‍या 142 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा कायम होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार 227 रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार 074 रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात चार तर डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात नऊ रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील 102 तर मालेगाच्‍या 38 रुग्‍णांचा समावेश आहे. (677 corona positive patients found in Nashik district)

Corona
नाशिकमध्ये आढळली तिसरी प्राचीन बुद्ध लेणी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com