Nashik News: दहिदी शिवारातून सर्पमित्रांनी पकडला तब्बल 7 फूटाचा अजगर!

Officers and staff of the forest department office here along with snake mates catching pythons in Dahidi Shivara.
Officers and staff of the forest department office here along with snake mates catching pythons in Dahidi Shivara.esakal

Nashik News : दहिदी (ता. मालेगाव) शिवारात शेतीकामे करणाऱ्या शेतकऱ्यांना आढळून आलेला सात फूट व दहा किलो वजनाचा मोठा अजगर शहरातील तिघा सर्पमित्रांनी शिताफीने पकडला.

येथील सर्पमित्र बंडू माहेश्‍वरी व त्यांच्या सहकारी मित्रांनी हा दुर्मिळ जातीचा अजगर पकडून वन विभागाच्या ताब्यात दिला. (7 foot python caught by snake charmers from Dahidi Shivara Nashik News)

दहिदी शिवारात खोंडे कापणीचे काम करणाऱ्या मजुरांना बुधवारी (ता. १९) सकाळी अजगर दिसला. अजगराची लांबी पाहून मजूर भीतीने पळून गेले.

वनपट येथील शिंदे नामक गृहस्थाने येथील सर्पमित्र रोहित सपकाळ यांना दहिदी शिवारात मोठे जनावर असल्याचा दूरध्वनी केला. त्यानंतर रोहित तातडीने त्याचे सहकारी सर्पमित्र अमित मदारी व हृतिक इंगळे यांच्यासह पोचले.

तिघांनी बंडू माहेश्‍वरी यांच्या सूचनेनुसार अजगराला पकडून श्री. माहेश्‍वरी यांच्याकडे आणले. सर्पमित्रांनी वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांना दूरध्वनी करून अजगर पकडल्याची व वन कार्यालयात घेऊन येत असल्याची माहिती दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Officers and staff of the forest department office here along with snake mates catching pythons in Dahidi Shivara.
Nashik Onion Rates : शेतकऱ्यांची कांदाविक्रीबाबत संभ्रमावस्था! भाववाढीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

अजगर वन विभागाच्या ताब्यात असून, त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. हा अजगर अतिशय दुर्मिळ बिगर विषारी असून, साधारण एक वर्षाचा आहे.

हा प्राणी शक्यतो दलदलीच्या ठिकाणी राहाणे पसंत करतो, असे सर्पमित्र माहेश्‍वरी यांनी सांगितले. या भागात आणखी एक दहा फूट अजगर असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

Officers and staff of the forest department office here along with snake mates catching pythons in Dahidi Shivara.
Legislative Session : शिक्षण विभागातील तरतुदीने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवीत!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com