esakal | नाशिक : दुष्काळी तालुक्यांना दिलासा, पावसाळीपट्टा मात्र तुटीत
sakal

बोलून बातमी शोधा

darna dam.jpg

नाशिक : दुष्काळी तालुक्यांना दिलासा, पावसाळीपट्टा मात्र तुटीत

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : शहर- जिल्ह्यात आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधारेमुळे धरणांमध्ये ७१ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील २४ धरणांत मिळून ४६ हजार ६१३ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर व दारणा धरणांत पिण्यासाठीची सोय झाली आहे. दरम्यान, शनिवारी (ता. ११) दुपारी चारला दारणा धरणातून सहा हजार ७४८ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला.

मागील आठवड्यापासून जिल्ह्याच्या दुष्काळी पूर्वपट्ट्यातील तालुक्यांत पावसाने चांगली हजेरी लावली. नांदगावसारख्या दुष्काळी तालुक्यात गेल्या दहा वर्षांत प्रथमच एवढा पाऊस झाला. नांदगाव तालुक्यात १३४ टक्के, मालेगाव- ११४, देवळा- १००, येवला- ९१ टक्के पाऊस झाला आहे. चांदवड तालुक्यात मात्र जेमतेम ४५ टक्केच पाऊस झाला असून, तालुक्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. तर, सिन्नर तालुक्यात ५८ टक्के पाऊस झाला आहे.

हेही वाचा: अवघ्या २० रुपयांसाठी मजुराची गळा चिरून हत्या; नाशिकमधील प्रकार

पावसाळीपट्टा तुटीत

दुष्काळी तालुक्यांत पावसाने आधार दिला असला, तरी पावसाळी तालुक्यांत मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. नाशिक तालुक्यात आतापर्यंत अवघा ४५ टक्के पाऊस झाला आहे. दिंडोरी- ५९, त्र्यंबकेश्‍वर- ६३, तर इगतपुरी तालुक्यात ८३ टक्के पाऊस झाला आहे. पावसाळी तालुक्यांपैकी एकही तालुक्यात शंभर टक्के पाऊस झालेला नाही. जेमतेम धरण भरून पिण्याची पाण्याची सोय होईल, एवढाच पाऊस झाला आहे. त्यामुळे सिंचनाची सोय होण्यासाठी पावसाळी तालुक्यांना अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.

यंदा ९ सप्टेंबर कोरडाच

जिल्ह्यात ९ सप्टेंबर हा दिवस अनेक वर्षांपासून पुराचा दिवस राहिला आहे. ९-९ या दिवसाचे अनेक महापूर नाशिककरांच्या स्मरणात आहेत. यंदाचा ९ सप्टेंबरचा दिवस मात्र गोदावरीच्या पुराचा नव्हता. दारणेतून तीन हजार ४२५, भावली- ३८२, नांदूरमध्यमेश्‍वर- पाच हजार ११३, चणकापूर- २२०, हरणबारी- २१२, नागासाक्या- २१२, वालदेवी- ६५, तर गोदावरीतून ३० क्यूसेक विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील पाणीसाठा

धरण समूह दलघफू टक्के

गंगापूर ८८९९ ८८

दारणा १५८४७ ८४

पालखेड ४८३२ ५८

गिरणा १४१४८ ६१

हेही वाचा: दुबार बोगस मतदारांमुळेच वाढले भाजपचे बळ; बडगुजर यांचा घणाघाती आरोप

शंभर टक्के भरले

माणिकपुंज, नागासाक्या, हरणबारी, वालदेवी, आळंदी

आकडे बोलतात...

मोठे प्रकल्प ७ ४८००४

मध्यम प्रकल्प १७ १७६६०

एकूण क्षमता २४ ६५६६४

उपलब्ध साठा ४६६१३

loading image
go to top