esakal | अवघ्या २० रुपयांसाठी मजुराची गळा चिरून हत्या; नाशिकमधील प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

अवघ्या २० रुपयांसाठी मजुराची गळा चिरून हत्या; नाशिकमधील प्रकार

sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : पंचवटी येथे एका फिरस्ती मजुरावर कटरने गळ्यावर वार केल्याची घटना शुक्रवारी (ता.१०) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. अधिक रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी रात्रीच संशयित पंडित ऊर्फ पंड्या ऊर्फ लंगड्या रघुनाथ गायकवाड (३२, रा. पिंपळद, त्र्यंबकेश्वर) याला ताब्यात घेतले. वीस रुपये दिले नाही म्हणून गळा कापल्याची त्याने कबुली दिली. तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.


फिरस्ती मजूर सुनील (४०, पूर्ण नाव माहीत नाही) हा मोनू श्यामलाल बनसोड ऊर्फ सागर बाबा (५१, मुळ रा. जबलपूर थाना, गोरखपूर, हल्ली नाशिक) व बिनेश शुभम नायर (३३, मूळचा केरळ, सध्या पंक्चर काढण्याचे काम करणारा) हे तिघे गेली पाच ते सहा महिन्यांपासून राम रतन लॉजच्या समोरच्या भागात रात्री येऊन झोपत होते. ते शुक्रवारी रात्री तेथे आल्यानंतर तेथे संशयित पंडित गायकवाड तेथे आला. त्याने सुनील याच्याकडे वीस रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही म्हणून त्याने त्याच्याजवळील कटरने सुनीलच्या गळ्यावर वार केला. जखमी सुनील जुना आडगाव नाका येथून वाल्मीक नगरातून सेवाकुंज येथे येऊन पडला.

हेही वाचा: दुबार बोगस मतदारांमुळेच वाढले भाजपचे बळ; बडगुजर यांचा घणाघाती आरोप

पोलिसांना माहिती कळताच जखमी सुनीलला उपचारासाठी पाठविले. मात्र, अधिक रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तो ज्या मार्गाने आला त्या मार्गावर रक्ताचे थेंब पडले होते. पोलिसांनी माग काढला. तेथील सीसीटीव्हीत पेट्रोलपंपावर एकजण हात धूत असल्याचे दिसले. त्यावरून तपास केल्यानंतर पोलिसांनी सागर बाबाला ताब्यात घेतले. त्याच्यासोबतचा बिनेश नायर याचा शोध घेऊन त्याची चौकशी केली असता, हा वार दोघांनी केला नसल्याचे समजले. त्यांनी सांगितलेल्या वर्णनावरून आणि कपड्यावरून पोलिसांनी तपास केला. तपोवनातील उद्यानात संशयित पंडित गायकवाड पोलिसांना सापडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त मधुकर गावित, पंचवटी ठाण्याचे निरीक्षक सीताराम कोल्हे व गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार व सहाय्यक उपनिरीक्षक बाळनाथ ठाकरे, अशोक काकड, सागर कुलकर्णी, दीपक नाईक, राकेश शिंदे, विलास चारोस्कर, नितीन जगताप, श्रीकांत कर्पे, अविनाश थेटे, गोरक्ष साबळे, योगेश सस्कर , घनश्याम महाले, नारायण गवळी,कल्पेश जाधव,राजेश राठोड, कुणाल पचलोरे, अंबादास केदार यांनी या खुनाची उकल केली.

हेही वाचा: नाशिक : कोरोनाचे नियम मोडणाऱ्या मंडळांवर होणार कठोर कारवाई

loading image
go to top