दिंडोरीसह अजंग अन् विंचूरमध्ये 7 हजार 120 कोटींची औद्योगिक गुंतवणूक

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी ही माहिती दिली.
industry
industrySakal media

सातपूर (नाशिक) : अतिरिक्त दिंडोरी औद्योगिक वसाहतीमध्ये सहा हजार, अजंग-मालेगावमध्ये एक हजार अन विंचूरमध्ये १२० अशी एकुण ७ हजार १२० कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी ही माहिती दिली.

जिल्ह्यातील अतिरिक्त दिंडोरी औद्योगिक वसाहतीमधील ३४ कारखान्यांमधून ४ हजार ६८९, तर अजंगमधील २८ कंपन्यांमधून २ हजार ९१४ कामगारांच्या रोजगाराची निर्मिती होणार असल्याचेही श्री. गवळी यांनी सांगितले. पालकमंत्री छगन भुजबळ आणि कृषी मंत्रीपदाचा कार्यभार काढून घेण्यात आलेले दादा भुसे यांच्यासह ‘निमा‘ आणि ‘आयमा‘च्या पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे औद्योगिक गुंतवणुकीसाठी पाठपुरावा राहिला. श्री. गवळी यांनी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळवले आहे. आदिवासी भागातील तरुणाईला रोजगाराची संधी आता खुणावू लागली आहे.
अतिरिक्त दिंडोरीमध्ये रिलायन्सने १ हजार २०६ कोटींची गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे. या कंपनीत २ हजार १०० जणांना काम मिळणार आहे. याशिवाय इंडियन ऑईल कंपनीत ३५० कोटींची गुंतवणूक करणार आहे. या कंपनीत २०० जणांना काम मिळणार आहे. याशिवाय प्रोकॉममध्ये १ हजार ८५० कोटींची गुंतवणूक असेल. ही कंपनी एक हजारांहून अधिक जणांना रोजगार उपलब्ध करणार आहे.

industry
राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवले, कायदा काय सांगतो?
industry
उद्या बहुमत चाचणी होणार का? सेनेच्या आव्हानावर सुप्रिम कोर्टात तात्काळ सुनावणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com