Nashik News : अबंधितमधून जिल्ह्यातील 1378 ग्रामपंचायती मालामाल; 40.63 कोटींचा दुसरा हप्ता जमा

fund
fundesakal
Updated on

नाशिक : पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना २०२२-२३चा अबंधित निधीच्या दुस-या हप्त्यापोटी ७२२.२७ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. (722 27 crore received in second installment of restricted funds for year 2022 23 received by rural local bodies in state nashik news)

यातून नाशिक जिल्ह्यासाठी ४० कोटी ६३ लाख ६३ हजारांचा निधी मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एक हजार ३७८ ग्रामपंचायती मालामाल होणार आहेत. दरम्यान, प्राप्त निधी तालुकानिहाय वर्ग देखील करण्यात आला आहे.

या निधीतून ग्राम पंचायतींना कर्मचाऱ्यांचा पगार, तसेच आस्थापना विषय बाबी वगळून अन्य स्थानिक गरजांनुसार आवश्यक कामे घेण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. जून २०२३ अखेर या निधीतून ५० टक्के खर्च झाल्याशिवाय पुढील हप्त्याचे वाटप करण्यात येणार नाही. खर्च करण्याची जबाबदारी ही जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यावर असेल.

दरम्यान, यातून आपल्या ग्रामपंचायतीला किती निधी मिळणार, असा प्रश्‍न अनेकांना आहे. अशावेळी २०११ची जनगणना लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येच्या गुणोत्तरास आपल्या ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येने गुणल्यास मिळणारा निधी समजतो.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

fund
Parking Problem : शहरात पुन्हा ‘टोइंग’ च्या हालचाली! लवकरच नवीन ठेकेदार नेमणार

झेडपी, पंचायत समिती वंचित केंद्राकडून मिळणाऱ्या निधीतून ग्रामपंचायतींना ८०, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितींना प्रत्येकी दहा टक्के निधी दिला जातो. मात्र सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे वर्षभरापासून वित्त आयोगाच्या निधीपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वंचित असल्याचे सांगितले जाते.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींना मिळालेला निधी

तालुका ग्रामपंचायत वर्ग झालेली रक्कम

बागलाण १२९ तीन कोटी ८८ लाख ४८ हजार

चांदवड ९० दोन कोटी ४५ लाख २२ हजार

दिंडोरी १२१ तीन कोटी ४७ लाख १३ हजार

देवळा ४२ एक कोटी ५३ लाख ९५ हजार

इगतपुरी ९२ दोन कोटी ४९ लाख ७३ हजार

कळवण ८६ दोन कोटी १८ लाख ३६ हजार

मालेगाव १२५ चार कोटी २६ लाख ८२ हजार

नांदगाव ८८ दोन कोटी १४ लाख ५७ हजार

नाशिक ६६ दोन कोटी ३६ लाख २३ हजार

fund
NMC News : LED दिव्यांचा लखलखाट पोचला लाखावर! पावणेदोन कोटी रुपयांची बचत

निफाड ११८ चार कोटी ८८ लाख ०४ हजार

पेठ ७३ एक कोटी ३१ लाख ६१ हजार

सुरगाणा ६१ एक कोटी ९७ लाख ५८ हजार

सिन्नर ११४ तीन कोटी २७ लाख ४६ हजार

त्र्यंबकेश्‍वर ८४ एक कोटी ८० लाख ६२ हजार

येवला ८९ दोन कोटी ५७ लाख ८३ हजार

एकूण १,३७८ दहा कोटी ६३ लाख ६३ हजार.

fund
Market Committee Election : आजी-माजी आमदारांनी थोपटले दंड; विधानसभा निवडणुकीचा ट्रेलर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com