Gaming Addiction : शाळकरी 75 टक्के मुले ‘गेमींग'च्या विळख्यात

Gaming Addiction in School Students
Gaming Addiction in School Studentsesakal

नाशिक : अवघ्या काही महिन्‍यांच्‍या बाळांपासून ते शाळा-महाविद्यालयीन मुले तंत्रज्ञानाच्‍या दुष्टचक्रात अडकली आहेत. ७५ टक्‍के बालकांमध्ये वयोगटनिहाय स्‍मार्टफोन वापराचे वेगवेगळ्या स्वरूपाचे व्‍यसन जडले आहे. तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार दिवसाला किमान दोन-तीन तासांपासून तर कमाल दहा ते बारा तासांपर्यंत ‘गेमींग’ साठी मोबाईलचा वापर करणाऱ्या मुलांचा समावेश आहे. (75 percent of school children are addicted to gaming Nashik News)

दिवाळीच्‍या सध्याच्या सुट्यांमध्ये चिमुकले मैदानी खेळात रमायला हवेत. परंतु ‘गेमींग’ मुळे सुट्यांचा आनंद हिरावला गेल्याचे चित्र घराघरांमधून तयार झाले आहे. त्यातून आरोग्यावर गंभीर परिणामांची चिन्हे दिसू लागली आहेत. सुट्यांमुळे मुले घरी आहेत. अशावेळी मैदानी खेळांची मौजमजा लुटत असताना अनुभव विश्‍व रुंदावणाऱ्यासाठी मित्र-मैत्रिणींसोबत मनसोक्‍त गप्पा, छंदाची शिबिरे हे समीकरण पाहावयास मिळत नाही. कोरोना महामारीच्‍या काळात सर्व काही ठप्प असताना शिक्षण ऑनलाइन माध्यमावर अवलंबून होते.

या कालावधीत तंत्रज्ञानामुळे शिक्षणात खंड पडला नसल्‍याने मोठा दिलासा पालक व विद्यार्थ्यांना मिळाला. मात्र तंत्रज्ञान वापराचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. वयोगटनिहाय वेगवेगळ्या स्वरूपात वापर असला तरी दुष्परिणाम बहुतांश सारखे असल्‍याने पालकांनी सतर्क होण्याची आवश्‍यकता असल्याचे तज्ज्ञ सांगताहेत. प्राथमिकस्‍तरावर या व्‍यसनापासून बालकांना मुक्‍त न केल्‍यास पुढे समुपदेशन, औषधोपचार घेण्याची गरज उद्भवू शकते, असे जाणकारांचे म्‍हणणे आहे.

Gaming Addiction in School Students
Nashik Winter Temperature : नाशिकचे किमान तापमान 12.6 अंशांवर

वयोगटनिहाय असा होतोय वापर

- ६ महिन्‍यांपासून ५ वर्षांपर्यंत : मोबाईलवर मनोरंजनात्‍मक, कार्टुनचे व्हिडिओ पाहणे

- ६ ते १४ वर्षांपर्यंत : मोबाईल, ऑनलाइन ‘गेमींग' ॲपचा वापर

- १५ ते २१ वर्षांपर्यंत : सोशल मीडिया, गेमींग, ओटीटीचा अमर्याद वापर

असे होताय दुष्परिणाम

बालकांचा स्‍क्रीनटाईम वाढल्‍याने डोळे व श्रवण यंत्रणेच्‍या तक्रारी वाढण्यासह मानसिक स्वरूपाच्या व्‍याधी उद्भवू शकतात. त्यामध्ये मुले एकलकोंडे होणे, एकाग्रतेचा अभाव, चिडचिडेपणा वाढणे, आत्‍मविश्‍वास घटणे, मुले हिंसक होणे, आभासी विश्‍वामुळे वास्‍तविक जगापासून संवाद तुटणे, भित्रेपणा वाढणे, न्‍यूनगंड, सामाजिक भान निर्माण न होणे, संवाद कौशल्‍यांचा अभाव असे दुष्परिणाम उद्भवू शकतात, अशी भीती तज्ज्ञांना वाटते

"कोरोना महामारीत तंत्रज्ञानाचा शिक्षणासाठी उपयोग झाला असला तरी आता विद्यार्थी दशेत स्‍मार्टफोन वापर मर्यादित स्वरूपात असणे आवश्‍यक आहे. विशेषतः गेमींग, सोशल मीडिया अतिवापरामुळे मुलांमध्ये सौम्‍य ते गंभीर मानसिक आजार उद्भवत आहेत. या व्‍यसनाधिनतेपासून बालकांना दूर ठेवण्याची जबाबदारी पालकांनी स्‍वीकारायला हवी."

-डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचार तज्ज्ञ

Gaming Addiction in School Students
Bogus Medical Certificate Case : डॉ. श्रीवास यांना अंतरिम जामीन मंजूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com