Nashik Winter Temperature : नाशिकचे किमान तापमान 12.6 अंशांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Winter Temperature News

Nashik Winter Temperature : नाशिकचे किमान तापमान 12.6 अंशांवर

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून राज्‍यभर गारठा वाढत असताना, नाशिकच्‍या तापमानातही घसरण होत आहे. मंगळवारी (ता.१) नाशिकचे किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअस नोंदविले असून, हे यंदाच्‍या हंगामातील निच्चांकी किमान तापमान ठरले आहे. २८.६ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविले गेले आहे. (Nashik Winter Temperature update Minimum temperature of Nashik under 13 degrees Nashik News)

हेही वाचा: YCMOU Admission : विलंब शुल्‍कासह मुक्‍तमध्ये प्रवेशाची 15 पर्यंत मुदत

गेल्‍या पंधरा दिवसांपासून शहर परिसरात सायंकाळनंतर शीतलहरींची अनुभूती नागरीकांना येत आहे. वातावरणात गारवा जाणवत असल्‍याने तापमानातही सातत्‍याने घसरण सुरू आहे. गेल्‍या दहा दिवसांत नाशिकचे किमान तापमान तब्‍बल दहा अंशांपर्यंत घसरले आहे. गेल्‍या २१ ऑक्‍टोबरला नाशिकचे किमान तापमान २२ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २९.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते.

त्‍यातच मंगळवारी (ता.१) नाशिकचे किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून, हे यंदाच्‍या हंगामातील निच्चांकी तापमान ठरले आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिकचे तापमान १३.३ अंश सेल्सिअस नोंदविले होते. येत्‍या काही दिवसांत गारठ्यात आणखी वाढ होताना तापमान एकअंकी होण्याचा अंदाज वर्तविला जातो आहे.

हेही वाचा: MPSC Timetable : लोकसेवा आयोग परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर