

76 Year Old Woman Trapped in Well for Two Days Survives by Holding Pipe as Rescue Team Conducts Dramatic Operation
sakal
गणूर (चांदवड) : काळोखाने वेढलेली विहीर... अंगाला बोचणारे थंड पाणी... अधूनमधून अंगावर पडणारा पाऊस आणि वर आकाशाकडे पाहताना दिसणारी उंच विहिरीची भिंत. मदतीची कोणतीही शाश्वती नाही. अशा भयावह परिस्थितीत ७६ वर्षीय आजीने दोन रात्र-दिवस एका पाइपाचा आधार घेत जीवनाची आस धरून ठेवली. नियतीने जणू मृत्यूच्या दारापर्यंत नेले होते; मात्र त्याच वेळी मदतीचे हात धावून आले आणि ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा अक्षरशः प्रत्यय आला.