म्युकरमायकोसिसचा वीस वर्षांचे रेकॉर्ड ब्रेक!

Mucormycosis
MucormycosisEsakal
Updated on
Summary

नाशिक, नगर, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमध्ये म्युकरमायकोसिस आजाराने डोके वर काढले आहे.

नाशिक : कोरोनाबाधित (Corona) रुग्णांना (Patients) उपचाराअंती आता म्युकरमायकोसिस (Mucormycosis) या बुरशीजन्य आजाराचा सामना करावा लागत आहे. आत्तापर्यंत वर्षात पंधरा ते वीस रुग्ण या आजाराचे आढळून येत होते. परंतु कोरोना (Corona) पश्‍चात म्युकरमायकोसिस (Mucormycosis) आजाराने मागील वीस वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यात ४०७ रुग्ण आढळून आले असून, २२ रुग्णांचा बळी गेला आहे. विभागात तब्बल ७७४ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळल्याने कोरोना संसर्गाचा जोर कमी होत असताना या आजारावर उपचाराचे नवे आव्हान उभे राहिले आहे. (774 patients with mucormycosis have been found in nashik)

Mucormycosis
नाशिक शहरात ११८४ धोकादायक घरे, वाडे

मागील वर्षी कोरोना संसर्गाने हाहाकार उडविल्यानंतर डिसेंबरअखेरपर्यंत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली. त्यानंतर कोरोना आहे की नाही, अशी स्थिती होती. मात्र हलगर्जीमुळे फेब्रुवारीअखेरपासून कोरोनाने पुन्हा उचल खाल्ली. नाशिक शहरात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २८ हजारांपर्यंत पोचली होती. बळींचा आकडा दोन हजारांच्या पार गेला. कोरोनाच्या बिकट परिस्थितीतून मार्ग निघत असताना म्युकरमायकोसिसचे आव्हान उभे राहिले आहे. बुरशीजन्य या आजाराने नागरिक हैराण होत आहे. आजार बळावत असताना अॅम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे.

Mucormycosis
कोरोना बळींचे पुन्‍हा नाशिक शहर केंद्र

म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण यापूर्वी फार कमी प्रमाणात होते. शहरातील काही कान- नाक व घसा तज्ज्ञांकडे आत्तापर्यंत अशा प्रकारचे रुग्णचं दाखल झाले नसल्याचे सांगण्यात आले. गेल्या वीस वर्षांपासून या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र शहरात वर्षाला पंधरा ते वीस रुग्ण आढळून येत होते. मात्र कोरोना पश्‍चात परिस्थितीत मोठा फरक पडला असून, मागील रुग्णवाढीचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत.

Mucormycosis
नाशिक जिल्ह्यातील ननाशी परिसरात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का

नाशिक विभाग आघाडीवर

नाशिक, नगर, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमध्ये म्युकरमायकोसिस आजाराने डोके वर काढले आहे. या आजाराचे रुग्ण वाढत असताना उपचारासाठी प्रभावी ठरणारे अॅम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. नाशिक विभागात ७७४ रुग्णांची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यात ४०७, नगरमध्ये २०४, धुळे- ९८, जळगाव- ४५, तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये वीस म्युकरमायकोसिस रुग्णांची नोंद झाली आहे. ७७४ रुग्णांपैकी ६१ रुग्ण बरे झाले आहे, तर ६७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Mucormycosis
कोरोनामुळे मृत्यूचा नाशिक जिल्ह्यात पुन्हा विस्फोट!

नाक- कान- घसातज्ज्ञ म्हणून काम करताना आत्तापर्यंत माझ्याकडे वर्षातून अवघे दोन रुग्ण या आजाराचे आढळत असे. तेही मधुमेही. मात्र फेब्रुवारी- मार्च महिन्यापासून म्युकरमायकोसिसचे आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ही दिवसाला दोन झाली आहे.

-डॉ. मुकेश मोरे, नाक- कान- घसातज्ज्ञ

आकडे बोलतात...

नाशिक विभागातील चित्र

नाशिक जिल्हा : २२

नगर : ६

जळगाव : ५

धुळे : ३

(774 patients with mucormycosis have been found in nashik)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com