
Nashik News:दिवाळीचा सण धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. अगदी दिवाळीपूर्वी घराघरांत राबविलेली स्वच्छता मोहीम असो, किंवा दिवाळीचा सण साजरा करताना झालेली आतषबाजी, यामुळे नेहमीपेक्षा जास्त कचरा संकलित करण्यात आला आहे.
गल्लोगल्ली व उपनगरीय परिसरामध्ये फिरताना घंटागाडीच्या माध्यमातून गेल्या दहा दिवसांमध्ये तब्बल ८ हजार १५३.७३ टन कचरा संकलित करण्यात आला आहे. (8 thousand tons of garbage collected in 10 days nashik news)
दिवाळीच्या सणाची चाहुल लागताच घराघरात स्वच्छता मोहीम हाती घेतली जाते. या मोहिमेत घरातील अनावश्यक वस्तू, कचरा घंटागाडीत टाकला जातो. या पार्श्वभुमीवर महापालिका प्रशासनातर्फे घंटागाड्या नियमित स्वरुपात उपलब्ध करुन देताना कचरा संकलन करण्यात येत होते. ऐन दिवाळीच्या सणामध्ये लक्ष्मीपूजन व त्यानंतरच्या दिवसांमध्ये जोरदार आतिषबाजीचा आनंद नाशिककरांनी घेतला.
या कालावधीतदेखील फटाक्यांमुळे उद्भवणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढलेले होते. आरोग्याचा प्रश्न उद्भवू नये, याकरिता यंत्रणेमार्फत जलदगतीने स्वच्छता करतांना कचरा संकलित करण्यात आलेला आहे. घराघरातून तसेच गार्डन व डिब्रेज असे एकंदरीत दहा दिवसांत आठ हजार टनहून अधिक कचरा संकलित करण्यात आलेला आहे.
गेल्या दहा दिवसांत कचरा संकलनाची स्थिती-
दिनांक संकलित कचरा (टनमध्ये)
६ नोव्हेंबर ८४०
७ नोव्हेंबर ८१८.९
८ नोव्हेंबर ८१३.१८
९ नोव्हेंबर ८३७.३१
१० नोव्हेंबर ८६७.२१
११ नोव्हेंबर ८८४.४१
१२ नोव्हेंबर ८२०.९८
१३ नोव्हेंबर ७७५.९९
१४ नोव्हेंबर ७९३.१६
१५ नोव्हेंबर ७०२.५६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.