
Corona Update : जिल्ह्यात 80 पॉझिटिव्ह, 58 रुग्ण कोरोनामुक्त
नाशिक : जिल्ह्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांची (Corona Patients) संख्या सौम्य स्वरूपात वाढत चालली आहे. रविवारी (ता. १०) जिल्ह्यात ८० रुग्णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह (Positive Cases) आले, तर ५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यातून ॲक्टिव्ह रुग्णसंख्येत २२ ने वाढ झाली झाली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात उपचार घेणाऱ्यांची संख्या ४२१ वर पोचली आहे. (80 positive 58 patients corona free in district Nashik Corona Update News)
नाशिक महापालिका क्षेत्रात रविवारी ५४ बाधित आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमधील अठरा, तर जिल्हाबाहेरील आठ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. मालेगाव महापालिका क्षेत्रात दिवसभरात नव्याने बाधित आढळून आला नाही. सध्या उपचार घेणाऱ्या ४२१ बाधितांपैकी दोघांना उपचारात ऑक्सिजनची आवश्यकता भासते आहे.
नाशिक ग्रामीणमधील २०५, नाशिक शहरातील १७४, तर मालेगाव १८, जिल्हाबाहेरील २४ बाधितांवर सध्या जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. प्रलंबित अहवालांची संख्या घटली असून, सायंकाळपर्यंत अवघे पंधरा अहवाल प्रलंबित होते. हे सर्व नाशिक महापालिका क्षेत्रातील होते.
हेही वाचा: Latest marathi news | नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस; यंदा धरणं ओव्हरफ्लो होणार
पॉझिटिव्हिटी दरात वाढ
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर वाढला आहे. रविवारी हा दर ७.६० टक्के राहिला. नाशिक महापालिका क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी दर दोन आकड्यांवर गेला असून, १६.२७ टक्के इतकी नोंद झाली आहे. नाशिक ग्रामीणमधील पॉझिटिव्हिटी दर २.८७ टक्के राहिला.
हेही वाचा: गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात होणार तब्बल 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग
Web Title: 80 Positive 58 Patients Corona Free In District Nashik Corona Update News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..