
Latest marathi news | नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस; यंदा धरणं ओव्हरफ्लो होणार
नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून नाशिक शहरासोबत जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे. गंगापुर, दारणा, वालदेवी, पालखेड, पुनद, मुकने, कादवा, धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नद्याही दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत.
जिल्ह्यातील धरणातील पाणी साठ्याची टक्केवारी
गंगापूर - ५६
दारणा - ६८
पालखेड - ४९
भावली- ६५
मुकणे-५१.
हेही वाचा: आला पावसाळा... आरोग्य सांभाळा..! अशी घ्या काळजी
गावांचा संपर्क तुटला
आज सकाळपासून पालखेड धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने खडकसुकेणे ते जोपुळ मार्गावरील कादवा नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने दोन्हीकडील बाजूची वाहतूक ठप्प झाली असून संपर्क तुटला आहे. पालखेड धरणातून मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात म्हाळुंगीला पहिला पूर....
सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात ठाणगाव परिसरातून वाहणाऱ्या म्हाळुंगी नदीच्या उगम क्षेत्रात चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी प्रवाहीत झाली आहे. यंदाच्या हंगामातील पहिलाच पूर म्हाळुंगीला आला असून भर पावसात पूर बघण्यासाठी ठाणगाव येथील ग्रामस्थांनी सिन्नर अकोले रस्त्यावरील पुलाजवळ गर्दी केली होती. ठाणगाव जवळच्या काळेवाडीला जोडणारा पूल देखील पाण्याखाली गेला असून.. रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. शेतकऱ्यांना घरातच बसून राहण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा: वजन झटपट कमी करायचं? आहारात खेकड्याचा समावेश करा
यंदा धरण ओव्हरफ्लो होणार...
सिन्नर अकोले रस्त्यावरील ठाणगाव लगत असलेल्या बंधाऱ्यातून नदीपात्रात झेपणारे पाणी बघता पाणी पातळीत सतत वाढ होत असून पूर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी या भागात पर्जन्यमान कमी झाल्याने म्हाळुंगी नदीवर बांधलेले नांदूर शिंगोटे जवळील भोजापूर धरण अर्धे देखील भरले नव्हते. यंदाच्या हंगामात मात्र हे धरण ओव्हरफ्लो होण्याची अपेक्षा आहे.
आठ वर्षानंतर पुल पाण्याखाली
कळवण तालुक्यातील पश्चिम पट्यात गेल्या तीन- चार दिवसांपासून पावसाच्या संतधारेने चणकापूर व पुनंद प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात जोरदार हजेरी लावल्याने गिरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत आज पहाटे पासूनच प्रचंड वाढ झाली. चणकापूर ३०१९८, पुनद ९५७४ मधुन ४० हजाराहून अधिक क्युसेकने पूरपाणी गिरणा व पुनद नदीपात्रात सोडण्यात आल्याने गेल्या सात ते आठ वर्षानंतर पहिल्यांदा नदीला प्रचंड पाणी आल्याचे नागरिक सांगतात. सकाळी आठा वाजता येथील पूल पाण्याखाली गेला आहे.
हेही वाचा: प्लॅन करण्यात आयुष्य घालवू नका
Web Title: Latest Marathi News Heavy Rain In Nashik District Rain Updates
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..