esakal | नाशिक जिल्‍ह्यात 897 ॲक्‍टिव्‍ह Corona रुग्‍ण; ९५ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

नाशिक जिल्‍ह्यात 897 ॲक्‍टिव्‍ह Corona रुग्‍ण

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या (Corona) कमी-अधिक प्रमाणात कोरोनामुक्‍त रुग्‍ण राहत आहेत. त्‍यामुळे जिल्‍ह्यातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्‍णांची संख्या सध्या स्‍थिर आहे. गुरुवारी (ता. ७) जिल्‍ह्यात ९० रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर ९५ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली. दोघा बाधितांच्‍या मृत्‍यूची नोंद आहे.

गुरुवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील ४२, नाशिक ग्रामीणमधील ४४, मालेगाव महापालिका क्षेत्रातील एक, तर जिल्‍हाबाहेरील तीन रुग्‍णांना कोरोनाची लागण झाली. ९५ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली. दोन बाधितांच्‍या मृत्‍यूची नोंद असून, यापैकी प्रत्‍येकी एक नाशिक शहर व नाशिक ग्रामीणमधील आहे.

सायंकाळी उशिरापर्यंत ७२८ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. यापैकी नाशिक ग्रामीणमधील ३७३, नाशिक शहरातील २०७, तर मालेगावच्‍या १४८ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ४५८ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी ४४१ रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील होते. जिल्‍हा रुग्‍णालयात दहा रुग्‍ण दाखल झाले. त्यात नाशिक ग्रामीणचे सहा, मालेगावच्‍या एका रुग्‍णाचा समावेश होता.

हेही वाचा: 'कोरोना संकट दूर होऊ दे' - छगन भुजबळांची सप्तश्रृंगीचरणी प्रार्थना

हेही वाचा: शेतकऱ्याला व्यापाऱ्याची मारहाण; दोन आडत्यांचे परवाने रद्द

loading image
go to top