Nashik : शहरातून 9 गुंडांची तडीपारी

9 criminals deported from Nashik
9 criminals deported from Nashik esakal

नाशिक : नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत गुन्हेगारी (Crimes) कारवाया करणाऱ्या भद्रकाली आणि मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ९ सराईत गुन्हेगारांना नाशिक शहर व जिल्ह्यातून तडीपार (Deported) करण्यात आले असून, यातील सहा जणांना दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. (9 goons deported from city nashik crime news)

पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी सराईत गुन्हेगाराविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, नाशिक परिमंडल एक अंतर्गत पोलिस ठाणेनिहाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेऊन कारवाई सुरू केली होती.

परिमंडल एकचे पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, मुंबई नाका व भद्रकाली पोलिस ठाण्यांतर्गत नऊ सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीच्या कारवाईबाबत सूचना करण्यात आल्या. यात दोघे टोळी करून गुन्हेगारी करीत असल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच येत्या काळातही सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईचा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.

9 criminals deported from Nashik
सरकारी कामात अडथळा; दाम्पत्याला 10 हजाराचा दंड

या गुंडांची तडीपारी
आकाश सूरज परदेशी (वय २०, रा. संभाजी चौक, नानावली), अक्षय बाळासाहेब भालेराव (नागसेननगर, वडाळा नाका) या दोघांना ६ महिन्यांसाठी तडीपार केले आहे. कुणाला सुधाकर एखंडे (२१, रा. शांतीनगर, मखमलाबाद) याची एका वर्षासाठी तडीपार केले आहे. याशिवाय जुबीन ऊर्फ रजा जयनोउदीन सय्यद (२४, खडकाळी, भद्रकाली), किशोर बाबूराव वाकोडे (२०, कोळीवाडा, कथडा), सुलतान बाबू शेख (२३, भारतनगर, मुंबई नाका), अफताब ऊर्फ रिम्मी नजीसर शेख (२८, घोडेस्वारबाबा दर्गाजवळ, भद्रकाली) यांना दोन वर्षांसाठी, तर आरबाज माईन बागवान (म्हाडा कॉलनी, भारतनगर), सलमान युसूफ अत्तार (नागजी चौक, नाशिक) या दोघांनाही शहर जिल्ह्यातून दोन वर्ष तडीपार करण्यात आले आहे.

9 criminals deported from Nashik
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com