Nashik Dengue Disease: डेंगीच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात 90 बाधित

dengue
dengueesakal

Nashik Dengue Disease : शहरात डेंगीच्या आजाराचा कहर वाढला असून, डेंगी नियंत्रणासाठी विभागीय साथरोग मृत्यू संशोधन समितीने महापालिकेच्या मलेरिया विभागाचे कान पिळले आहेत. तातडीने उपाययोजना न झाल्यास कारवाईचा ईशारा दिला आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात डेंगीच्या रुग्णसंख्येने नव्वदचा आकडा गाठला आहे. सणासुदीच्या काळात डेंगीचा कहर झाला असून, रुग्णालयेदेखील फुल झाली आहेत. दिवाळीचा सण साजरा करताना कुटुंब सांभाळू की रुग्ण सांभाळू, अशी अवस्था कुटुंबप्रमुखांची झाली आहे. ()

ऑक्टोबर महिन्यापासून डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते. परंतु यंदा नोव्हेंबर महिन्यात देखील रुग्णसंख्येचा आकडा वाढताना दिसत आहे. ऑक्टोबर महिन्यात तब्बल १९३ डेंगी बाधितांची नोंद झाल्यानंतर या महिन्यातील आकडा नोव्हेंबर महिन्यात मोडला जात असल्याचे भयावह चित्र दिसत आहे. डेंगीमुळे तीन संशयितांचा मृत्यू झाला. तीनही रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.

प्राप्त अहवालानुसार नाशिक रोड भागातील व्यक्तीचा मृत्यू डेंगीने झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, डेंगीच्या बळीनंतर आरोग्य उपसंचालक कपिल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली साथरोग मृत्यू संशोधन समितीची बैठक जिल्हा रुग्णालयात झाली. बैठकीत महापालिकेला डेंगी नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

dengue
Dada Bhuse News: संपूर्ण नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; पालकमंत्री दादा भुसे यांची मागणी

खासगी रुग्णालयाकडून डेंगी संशयितांची माहिती घेण्याबरोबरच डेंगीचे रुग्ण आढळून येत असलेल्या परिसरात धूर फवारणी वाढवणे, स्वच्छ पाण्यात गप्पी मासे सोडणे, घरांची तपासणी वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीला सहाय्यक उपसंचालक, सहाय्यक संचालक विवेक खतगावकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण, मलेरिया विभागप्रमुख डॉ. राजेंद्र त्र्यंबके उपस्थित होते.

डेंगी रुग्णांच्या संख्येतील वाढ

जुलैअखेरपर्यंत शहरात १४४ रुग्ण आढळले. ऑगस्ट महिन्यात ११७, सप्टेंबर २६१, ऑक्टोबर महिन्यात १९३ डेंगीचे रुग्ण आढळून आले. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरात ९० डेंगीबाधितांची नोंद करण्यात आली, तर ८०१ रुग्ण संशयित आढळले. जानेवारी ते नोव्हेंबर यादरम्यान ८०४ डेंगी बाधितांची नोंद झाली. वैद्यकीय विभागाकडून दररोज शंभर डेंगी संशयितांचे रक्तनमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जात आहेत.

dengue
Dengue mosquito : डेंगी वाहक डासांच्या अंड्यांचे गूूढ उकलले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com