Code of Conduct : आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर 922 फलक हटविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Code-of-Conduct

Code of Conduct : आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर 922 फलक हटविले

नाशिक : विधानसभेच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जानेवारी अखेरीस होणार असून त्यासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे दहा दिवसात सहा विभागात ९२२ फलक हटवण्यात आले आहे. (922 panels were removed in wake of Code of Conduct Code of Conduct nashik news)

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

हेही वाचा: Nashik News: सकाळे -भोसले गटात काटे की टक्कर; जिल्हा मजूर फेडरेशन अध्यक्ष, उपाध्यक्षांची आज निवड

त्याचप्रमाणे सोळा राजकीय मजकूर असलेले बोर्ड झाकून ठेवण्यात आले आहे. सामाजिक व सांस्कृतिक मंडळांच्या फलकांवर राजकीय मजकूर असल्यास तो काढून टाकावा अशा सूचना अतिक्रमण विभागातर्फे देण्यात आल्या आहे. दरम्यान, दहा दिवसात ३११ होर्डिंग्ज, ३१८ बॅनर, २९३ बोर्ड हटविण्यात आले आहे.

हेही वाचा: Dr. Amol Kolhe : ‘शिवपूत्र संभाजी’ महानाट्याला कुंभमेळा नगरीमुळे वेगळे महत्त्व : डॉ. अमोल कोल्हे