नाशिक- बारावीच्या निकालात नाशिक विभागातही मुलींची सरशी राहिली असून, ९३.६३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या उत्तीर्णांचे प्रमाण ८९.४४ टक्के राहिले. विभागाचा निकाल ९१.३१ टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांची घसरण झाली आहे. राज्यातील नऊ विभागांत नाशिक सातव्या स्थानी राहिले आहे.