
Nashik : पहिल्याच पावसात 93 घरांची पडझड
नाशिक : जिल्ह्यातील विविध भागात गुरुवारी (ता. ९) झालेल्या पावसात जिल्ह्यातील कच्च्या ९३ घरांची पडझड (houses Collapsed) झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. (93 houses collapsed in first monsoon rains in city Nashik News)
हेही वाचा: नाशिक रोडला मुसळधार पाऊस
अंगावर वीज पडल्याने दोन नागरिकांना जीवही गमवावा लागला. जिल्ह्यात गुरुवारी (ता. ९) पहिल्या पावसाने दमदार हजेरी लावली. नाशिक शहरासह चांदवड, मालेगाव आणि नांदगाव तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. यामध्ये मालेगाव (४४) आणि चांदवड (२७) तालुक्यांत असलेल्या सर्वाधिक कच्च्या घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली. नांदगाव तालुक्यात (१६) घरांची पडझड झाली आहे. वीज अंगावर पडल्याने नऊ छोट्या-मोठ्या जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे. यांसह तिन्ही तालुक्यातील १७ कांदाचाळींचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा: नाशिक : जिल्ह्यातील अनिष्ट तफावतीतील सोसायट्यांना कर्ज वाटप परवानगी
Web Title: 93 Houses Collapsed In First Monsoon Rains In City Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..