Nashik ZP News: जि. प.चे 93 शिक्षक होणार केंद्रप्रमुख; दिवाळीनंतर राबविली जाणार प्रक्रिया

93 teachers of zp will be center head nashik news
93 teachers of zp will be center head nashik newsesakal

Nashik ZP News : जिल्हा परिषदेतील प्राथमिक विभागाच्या पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या पदोन्नत्यांना विविध शिक्षक संघटनांनी हरकती नोंदविल्या होत्या.

मात्र, त्या दूर झाल्याने संबंधित ९३ शिक्षकांची सेवाज्येष्ठतेनुसार तालुकानिहाय केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती होईल. दिवाळीनंतर ही प्रक्रीया राबविली जाणार आहे. (93 teachers of zp will be center head nashik news)

जिल्ह्यात केंद्रप्रमुखांच्या १२२ पदांपैकी ९३ पदे रिक्त होती, ती भरण्याची मागणी शिक्षकांची होती. आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही या रिक्त पदांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यानंतर, प्राथमिक विभागाने ही प्रक्रिया राबविण्यास सुरवात केली. परंतु, पदोन्नती प्रक्रियेतील निकषाबाबत शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतले होते.

त्यामुळे ही प्रक्रिया चार महिन्यांपासून रेंगाळली होती. शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती न देता विषयनिहाय पदोन्नतीचे धोरण राबवून बेकायदेशीपणे पदोन्नतीची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे त्या निर्णयाविरोधात न्यायालयात शिक्षकांकडून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

93 teachers of zp will be center head nashik news
Nashik ZP News: जि. प. अधिकारी, कर्मचारींसह शिक्षकांची दिवाळी यंदा गोड; प्रशासनाकडून 1 तारखेलाच वेतन जमा

सेवाज्येष्ठताच महत्त्वपूर्ण

खंडपीठाने त्या याचिकेची गंभीर दखल घेत विषयनिहाय पदोन्नती अनेक शिक्षकांवर अन्याय करणारी असल्याने सेवाज्येष्ठतेनुसार केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती देण्याबाबतचे आदेश दिले होते. त्यामुळे तालुकानिहाय सेवाज्येष्ठतेनुसार पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक या निकषाने निर्धारित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

पदोन्नती मिळाल्यावर काही जिल्हा परिषदा वेतननिश्चिती करताना महाराष्ट्र नागरी सेवा पदोन्नतीची एक काल्पनिक वेतनवाढ देत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यावर सर्वसमावेशक सूचना देण्यात आली होती.

प्राथमिक शिक्षकांवर संबंधित शाळेत नेमून दिलेल्या विषयाच्या इयत्ता सहावी ते आठवीतील विशिष्ट विषयांच्या अध्यापनाची जबाबदारी असते. पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक हा शाळेच्या संपूर्ण व्यवस्थापनासाठी जबाबदार असून, त्यांना आठवड्यात किमान १८ तास अध्यापन करणे बंधनकारक असून, उर्वरित कालावधीत संबंधित शाळेचे प्रशासन हाताळावे लागते. त्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरण व साक्षरता यासाठी केंद्रप्रमुखपदाची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी दिली.

93 teachers of zp will be center head nashik news
Nashik News: मतदार जनजागृतीत नवयुवकांना सहभागी करा; जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com