नाशिक- राज्यस्तरावर आयोजित एमएचटी-सीईटी परीक्षेंतर्गत पीसीबी ग्रुपच्या परीक्षेला बुधवार (ता. ९)पासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील आठ केंद्रांवर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त हजेरी लावत परीक्षा दिली. पहिल्या दिवशीच्या दोन्ही सत्रांतील सरासरी उपस्थितीचे प्रमाण ९३.८२ टक्के इतके राहिले. दरम्यान, जीवशास्त्राच्या प्रश्नांची काठिण्यपातळी तुलनेत अधिक राहिल्याची प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी दिली.