नाशिक- सुटीवर गावी आलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांना ९५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. ही भरपाई राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीनंतर देण्यात आली. याशिवाय, शनिवारी (ता. १०) पार पडलेल्या लोकअदालतीमध्ये एकूण सहा हजार ९६० प्रकरणांचा निपटारा करत ४६ कोटी ३८ लाख रुपयांची वसुली करण्यात आली.