NEET Exam: वैद्यकीय प्रवेशाच्‍या ‘नीट’ ला 95 टक्‍के उपस्‍थिती; प्रश्‍नांनी घेतली विद्यार्थ्यांची परीक्षा

Crowd of parents outside the exam center on Sunday to give proper exams.
Crowd of parents outside the exam center on Sunday to give proper exams.esakal

NEET Exam : वैद्यकीय अभ्यासक्रम पदवीच्‍या प्रथम वर्षासाठी नॅशनल इलिजिब्‍लीटी कम एंट्रान्‍स टेस्‍ट (नीट) २०२३ परीक्षा रविवारी (ता.७) पार पडली. नाशिकमधील वीस केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने झालेल्‍या या परीक्षेत भौतिकशास्‍त्र, जीवशास्‍त्र विषयाच्‍या प्रश्‍न सोडविताना विद्यार्थ्यांचा कस लागला होता.

दरम्‍यान सुमारे बारा हजार विद्यार्थी प्रविष्ट असताना ११ हजार ४०० च्‍या सुमारास विद्यार्थी परीक्षेला उपस्‍थित होते. उपस्‍थितीचे प्रमाण ९५ टक्‍के राहिले. (95 percent attendance at NEET for medical entrance nashik news)

नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यातर्फे राष्ट्रीय पातळीवर नीट २०२३ परीक्षेचे रविवारी आयोजन केले होते. नियोजित वेळापत्रकानुसार दुपारी दोन ते पाच वाजून २० मिनिटे या कालावधीत ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पार पडली.

विद्यार्थ्यांना पेन व इतर साहित्‍य परीक्षा केंद्रावर उपलब्‍ध करून दिलेले होते. दरम्‍यान दुपारी बारापासूनच परीक्षा केंद्र परिसरात विद्यार्थी, पालकांची वर्दळ बघायला मिळत होती. दुपारी दीडपर्यंत केंद्रांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.

दरम्‍यान परीक्षेदरम्‍यान भौतिकशास्‍त्र व जीवशास्‍त्र विषयाशी निगडित प्रश्‍नांनी घाम फोडल्‍याचे काही परीक्षार्थ्यांनी सांगितले. परीक्षा पूर्ण झाल्‍यानंतर केंद्राबाहेर पडताना विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्‍वास सोडला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Crowd of parents outside the exam center on Sunday to give proper exams.
Nashik News : G 20 ही भारताला विश्वगुरू बनवण्यासाठीची एक सुरवात : राजेश पांडे

शेवटच्‍या मिनिटापर्यंत धावपळ..

परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी शेवटच्‍या मिनिटापर्यंत विद्यार्थ्यांची धावपळ सुरू असल्‍याचे अनेक केंद्रांवर बघायला मिळाले. निर्धारित वेळेत हजर झालेल्‍या विद्यार्थ्यांनाही विविध कारणांनी धावपळ करावी लागल्‍याने त्‍यांच्‍यासह पालकांची दमछाक झाली.

काही केंद्रांवर आधारकार्डाच्‍या मुळ प्रति सोबत छायांकित प्रत (झेरॉक्‍स) ची मागणी करण्यात आल्‍याने त्‍यासाठी विद्यार्थ्यांना नजीकच्‍या दुकानांमध्ये धाव घ्यावी लागली.

काही विद्यार्थ्यांनी छायाचित्रे आणलेली नव्‍हती. त्‍यामुळे ऐन वेळी व्‍यवस्‍था करताना दमछाक करावी लागली. परीक्षा केंद्रावर तैनात कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांना यथोचित सहकार्य केले.

नीट २०२३’ परीक्षेदरम्‍यानची क्षणचित्रे..

* ‘एनटीए’ तर्फे सूचित वेशभूषेत बहुतांश विद्यार्थ्यांची हजेरी.

* अनेक विद्यार्थ्यांच्‍या चेहऱ्यावर दिसला मास्‍क.

* शेवटच्‍या क्षणापर्यंत विद्यार्थ्यांची सुरु होती धावपळ.

* खासगी सुरक्षारक्षकांकडून तपासणीनंतर विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश

* केंद्र परिसरात बॅग, शैक्षणिक साहित्‍याचा लागला होता खच.

* परीक्षार्थ्यांना चपला, बूट बाहेर काढण्याच्‍या केंद्रांकडून सूचना.

* संपूर्ण परीक्षा कालावधीत अनेक पालक केंद्राबाहेर होते बसून.

* परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी बसविले होते जॅमर.

Crowd of parents outside the exam center on Sunday to give proper exams.
NAFED Onion Purchase: नाफेडतर्फे 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी? नोडल एजन्सी मार्फत कांद्याची खरेदी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com