Latest Marathi News | शेतमाल विक्रीसाठी तारेवरची कसरत कुंदर वस्ती शिवारातील विदारक चित्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

agriculture

Nashik : शेतमाल विक्रीसाठी तारेवरची कसरत; कुंदर वस्ती शिवारातील विदारक चित्र

नामपूर : गेल्या सहा- सात महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याला बाजार समित्यांमध्ये भाव मिळत नसल्याने कवडीमोल भावात शेतकऱ्यांकडून कांद्याची विक्री सुरू आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कांद्याची विक्री करण्यासाठी निताणे (ता. बागलाण) येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे.

प्रशासनाने याकामी लक्ष घालून शेतकऱ्यांचा प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी होत आहे. निताणे गावालगत कुंदर शिवारात देवमळा नावाचे छोटेसे धरण आहे. यंदा जून महिन्यापासूनच वरुणराजाची कृपा असल्याने धरण भरले असून, अतिरिक्त पाण्यामुळे रस्त्यावर तीन ते चार फुटापर्यंत पाणी असल्याने शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

(A shocking picture of Kundar settlement in Shiwar for selling farm produce Nashik pvc99)

हेही वाचा: Vastu Tips : घरामध्ये चुकूनही अशाप्रकारे ठेवू नका चपला-बूट, संकटांना तोंड द्यावे लागेल..

मोसम खोऱ्यासह बागलाण तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. उन्हाळ कांद्यासह भाजीपाल्याला भाव नसल्याने कवडीमोल भावाने शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावी लागत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतमालाच्या विक्रीसाठी अनंत अडचणींचा डोंगर उभा राहिल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. कुंदर वस्ती शिवारात सुमारे अडीचशे कुटुंबीय वास्तव्यास असून, तेथील शाळकरी मुलांना त्यांचे पालक डोक्यावर बसवून जीवघेणा प्रवास करतात.

कुंदर वस्ती शिवारात सुमारे अडीचशे कुटुंबीय वास्तव्यास असून, तेथील शाळकरी मुलांना त्यांचे पालक डोक्यावर बसवून जीवघेणा प्रवास करतात. अनेक पालक पाण्याच्या भितीमुळे आपल्या मुलांना शाळेत पाठवत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होते. रस्त्याला लागूनच देवमळा धरण असल्याने पूर्णपणे रस्ता पाण्यात गेला आहे. याकामी प्रशासनाने तातडीने दखल घेवून परिसरातील शेतकरी बांधवांना न्याय द्यावा, अशी मागणी कुंदन शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे. एकीकडे शेतमालाला भाव नाही.

हेही वाचा: पोस्ट ऑफिसची डबल मनी स्कीम, विना टेन्शन कमवा दुप्पट नफा...

''शेतमाल घेऊन जाण्यासाठी गावातील कुणीही वाहनधारक रस्त्याअभावी शेतात येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कुंदर शिवारातील नागरिकांना अतिशय विदारक परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.'' - विनोद देवरे, युवा शेतकरी, निताणे

हेही वाचा: भरदिवसा वृद्धेची पर्स पळवली मखमलाबाद रोडवरील प्रकार; घटना CCTVमध्ये कैद

टॅग्स :Nashikagroagro business