'खड्ड्यांचे गाव' म्हणून राज्यात 'या' गावाची नवी ओळख

Patholes
Patholesesakal

पळसन (नाशिक) : रस्ते विकासाचे प्रतीक आहे. रस्त्यांवरूनच विकासाची संकल्पना ठरविली जाते. एकीकडे स्मार्ट सिटी बुलेट ट्रेनचे स्वप्न बघणार्‍या देशात ग्रामीण भागात नागरिकांना जायला धड रस्ता नाही. नागरिकांना कोसो दूर तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागतात. सुरगाणा तालुक्यातील सर्व ठिकाणी रस्त्याचे तीन-तेरा वाजल्याने तालुक्याच्या विकासाला खीळ बसत असून त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे.

मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त

ग्रामीण भागातील रस्त्यांचे भाग्य उजळणार कधी हा जनतेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अनुत्तरीत आहे. रस्ते आणि विकास हे दोन्ही शब्द अगदी जवळचे आहेत, मात्र हे दोन्ही शब्द एकमेकांपासून कोसो दूर गेल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरावस्था झाली असून गावात जायला धड रस्ता नसल्याचे दिसून येते. तालुक्यातील बाऱ्हे ते पळसन, बाऱ्हे ते सुरगाणा मनखेड ते दांडीचीबारी, भवाडा ते ठाणगाव, आंबोडे ते बेडसे, पांगाराणे, पिंपळसोंड, तसेच उंबरठाण या ग्रामीण भागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत, या रस्त्यावरून वाहने चालविताना नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. यातील अनेक मार्ग तर खड्ड्यांचे मार्ग म्हणून ओळखले जातात या तालुक्यात एवढे खड्डे पडले आहेत त्यावरून प्रवास करणे नागरिकांच्या नाकीनऊ येत आहेत. सुरगाणा हे तालुक्याचे ठिकाण आहे, त्यामुळे विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना कामासाठी या मार्गावरून रात्री-अपरात्री प्रवास करावा लागतो, मात्र या मार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना एक दोन तास अगोदर घरातून बाहेर पडावे लागते.

Patholes
EDची नाशिकमध्ये छापेमारी? नवाब मलिक कनेक्शनची शक्यता

यागावांतील नागरिक खड्ड्यांमुळे त्रस्त झाले आहेत, महत्त्वाचे म्हणजे वेळोवेळी समस्या मांडूनही देखील सुरगाणा तालुक्यातील रस्ते दुरुस्त होत नसल्याने परिसरातील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने मागील महिन्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात झाल्याच्या घटना घडल्या होत्या. यावरुन या तालुक्यात किती मोठ्या प्रमाणात खड्डे असतील याचा सहज अंदाज बाधता येतो. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तालुक्यात सर्वच भागातील रस्त्यांची एवढी मोठी दुरवस्था झाली आहे की, हे खड्डे नागरिकांच्या जिवाला कारणीभूत ठरत आहेत. याबाबत तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी व शासनाने लक्ष देऊन या रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Patholes
...तर पेट्रोलपंप चालकांचा पोलिसांविरोधात बंद | Nashik

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com