नाशिक: राज्यात ‘आदि कर्मयोगी अभियान’ राबविण्यात येत असून या अभियानाचा प्रमुख उद्देश आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सक्रिय सहभाग आणि समन्वयातून हे अभियान यशस्वी करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या.