Pickup Accident
sakal
अंबासन: छत्रपती संभाजीनगर–अहवा राज्य महामार्गावरील अंबासन फाट्यावर झालेल्या पिकअप अपघातात बारा मजूर गंभीर जखमी झाले आहेत. कोबी काढण्यासाठी शेतामध्ये काम करण्यासाठी निघालेल्या या मजुरांना घेऊन जाणारी पिकअप अचानक उलटल्याने या सर्वांना मोठा फटका बसला. स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने जखमींना तातडीने मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी सकाळी साडे सातच्या सुमारास घडली.