Nashik News : 13 तालुक्यांत 1 मेपासून आपला दवाखाना

Aapla dawakhana in 13 talukas from May 1
Aapla dawakhana in 13 talukas from May 1 esakal

Nashik News : राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. (Aapla dawakhana in 13 talukas from May 1 in nashik news)

राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरी भागात, असे एकूण ५०० ठिकाणी आपला दवाखाना सुरू केला जाणार आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागामार्फत १ मे महाराष्ट्र दिनापासून जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये हा दवाखाना सुरू केला जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्शल नेहते यांनी दिली.

बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही मुंबई महापालिका आणि शिंदे सरकारची नवीन आरोग्य योजना आहे. ठाणे आणि मुंबई शहरात आपला दवाखान्यांतर्गत आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेनुसार जिल्ह्यातील निफाड, येवला, नांदगाव, चांदवड, देवळा, कळवण, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर, मालेगाव, सटाणा या १३ तालुक्यांसह नाशिक व मालेगाव महापालिका क्षेत्रांत जुन्या शासकीय जागांमध्ये ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Aapla dawakhana in 13 talukas from May 1
NMC Swimming Pool : महापालिकेचे जलतरण तलाव ‘हाउसफुल’! महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस सुरू

त्र्यंबकेश्वर तालुक्यात शासकीय जागा उपलब्ध झाली नसल्याने अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आपला दवाखानासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून नुकत्याच १३ एमबीबीएस दर्जाच्या डॉक्टरांची मुलाखत घेऊन नियुक्ती करण्यात येत आहे.

प्रत्येक ‘आपला दवाखाना’मध्ये एक डॉक्टर, एक नर्स रुग्णांच्या सेवेत असेल. जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्यावरील सर्वसाधारण रुग्णांचा भार हलका करण्यासाठी आपला दवाखाना ही योजना तालुकास्तरावर कार्यान्वित करण्यात येणार आहे.

या योजनेंतर्गत मिळणार या सुविधा

१) सकाळी सात ते दुपारी दोन आणि दुपारी तीन ते रात्री दहा, या वेळेत हे दवाखाने सुरू राहतील.

२) आपला दवाखान्यांतर्गत १४७ प्रकारच्या विविध वैद्यकीय चाचण्या विनामूल्य करून मिळतील.

३) पॉलिक्लिनिकमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांद्वारे विनामूल्य वैद्यकीय सल्ला आणि उपचार मिळेल.

४) महापालिकेच्या डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स रे इत्यादी चाचण्या केल्या जातील.

५) दवाखान्यात एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, एक फार्मासिस्ट आणि एक मदतनीस अशा चौघांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येत आहे.

६) कान-नाक-घसातज्ज्ञ, नेत्रचिकित्सा, स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय तपासणीतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, त्वचारोगतज्ज्ञ, दंतशल्यचिकित्सा, बालरोगतज्ज्ञ अशा आरोग्य सुविधा पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.

७) सदर दवाखान्यांमधून टॅबच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा आणि वितरण, निदान केलेली पद्धती याचा तपशील नोंदविण्यात येईल.

Aapla dawakhana in 13 talukas from May 1
Phalke Smarak : फाळके स्मारकाच्या विविध शुल्कामध्ये दुप्पट वाढ! स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com