पंचवटी- शाळेतून घरी येताना अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्यास म्हसरूळ पोलिसांना यश मिळाले आहे. या मुलीला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून ताब्यात घेत तिच्या पालकाच्या स्वाधीन केले. म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करीत आहेत. .२४ मार्च २०२५ ला अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे सकाळी अकराला शाळेत गेली होती. सायंकाळी पाचला शाळा सुटली तरी घरी आली नाही. मुलगी घरी आली नाही म्हणून तिच्या पालकांनी आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध घेतला. मात्र, ती कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे म्हसरूळ पोलिस ठाणे गाठत त्यांनी संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. .अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्याकरिता पोलिस उपनिरीक्षक गजानन जोशी यांनी गुन्हा तपासाचे कौशल्य वापरून तांत्रिक बाबी व गोपनीय माहितीनुसार माग काढला. अपहरण झालेली मुलगी लखनौ ते अयोध्या रस्त्यावर असल्याचे समजले. त्यानंतर म्हसरूळ पोलिसांच्या पथकाने येथे सापळा रचून संशयिताच्या तावडीतून मुलीची सुटका करत संशयितास अटक केली..Hit And Run : दारूच्या नशेत SUV चालकाने धडाधड वाहनांना उडवलं, ९ जणांना चिरडलं; दोघांचा मृत्यू, CCTV VIDEO VIRAL.वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल डहाके, उपनिरीक्षक गजानन जोशी, हवालदार राकेश शिंदे, प्रशांत वालझाडे, बाळासाहेब मुर्तडक, अंमलदार भाऊराव गवळी, प्रमोद गायकवाड, महिला पोलिस अंमलदार मेघा वाघ, राजश्री दिघोळे यांनी ही कामगिरी बजावली. तांत्रिक विश्लेषण विभागाकडील महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक जया तारडे, सायबर पोलिस ठाण्याकडील पोलिस अंमलदार भूषण देशमुख यांनी गुन्ह्याच्या तपासकामी वेळोवेळी माहिती पुरविली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.