
मालेगाव परिसरात अल्पवयीन मुलींचे अपहरण
मालेगाव (जि. नाशिक) : येथील सायने शिवार झोपडपट्टीतील सुनंदा लक्ष्मण भोसले यांच्या दोन मुली अक्का लक्षण भोसले (वय १२) व पिल्लू लक्षण भोसले (वय ९) यांचे ओळखीतील इसमांनी अपहरण (Abduction) केले आहे. (Abduction of minor girls in Malegaon area Nashik crime news)
हेही वाचा: SSC Result : हलाखीच्या परिस्थितीवर मात करत वैष्णवीचे यश
सुनंदा भोसले या मुळच्या लोणी (जि. अहमदनगर) येथील रहिवासी आहेत. अक्काचा रंग गोरा, नाक सरळ, उंची तीन फूट पाच इंच, अंगात लाल रंगाचा फ्रॉक, केस काळे लांब तसेच पिल्लुचा रंग गोरा, नाक सरळ, उंची तीन फूट, अंगात जांभळ्या रंगाचा फ्रॉक, केस लाल व काळे, लांब असे वर्णन आहे. दोन्ही मुलींचे ओळखीतील इसम दिपू दिपकभाई पवार, करिष्मा दिपू पवार, पाटील सनाप्पा पवार, लिली पाटील पवार (रा. भोईसर लोखंडी पाडा मुंबई) यांनी संगनमताने अपहरण केले आहे. दोन्ही मुलींबाबत काही माहिती असल्यास संबंधितांनी मालेगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे व उपनिरीक्षक विशाल पाटील यांना (भ्रमणध्वनी क्रं. ९०२८६४०८०७, ९९२१४२५०६३, ९०११८८४४२४) यांच्याशी संपर्क साधावा.
हेही वाचा: नाशिक : शहरात नवे 20 कोरोना रुग्ण
Web Title: Abduction Of Minor Girls In Malegaon Area Nashik Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..