Nashik News: अन... सरपंचानी घातला रिकाम्या खुर्चीला हार; आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी गैरहजर

Absence of medical officer in health center nashik news
Absence of medical officer in health center nashik newsesakal

Nashik News: आद्य स्वयंभू शक्तीपिठाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी अनुपस्थित राहात असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्र्याच्या मतदार संघातील नांदुरीचे आरोग्य केंद्र केवळ शोभेचे बाहुले बनले आहे.

दरम्यान नांदुरीचे सरपंचांनी काल गांधी जयंती साजरी केल्यानंतर आज गांधीगिरी आंदोलन करीत आरोग्य केंद्रात अनुपस्थित असलेल्या वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या खुर्चीला पुष्पहार घालून निषेध व्यक्त केला.(Absence of medical officer in health center nashik news)

नांदुरी येथे जवळपास सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये खर्च करुन अद्यावत आरोग्य केंद्राचे नुतनीकरण करण्यात आले. या आरोग्य केंद्रात जवळपास 15 ते 20 कर्मचारी इतकी पद संख्या आहेत, मात्र आरोग्य केंद्रात २- ३ कर्मचारीच नियमित उपस्थित राहातात. नेमणूकीस असलेले सर्व कर्मचारी उपस्थित राहत नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.

आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राहण्यासाठी निवास गृहे (हेड काॅर्टर) असुन त्याठिकाणी कोणीच राहत नसल्याने हे निवास गृहेही शोभेची वस्तू बनली आहे. ग्रामस्थांनी याबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसभेतही याबाबत तक्रारी केलेल्या आहेत. त्यानूसार सरपंच सुभाष राऊत यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थांनी पंचायत समिती, तालुका वैद्यकिय अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्याकडेही वेळोवेळी याबाबत तक्रारी केलेल्या आहेत.

मात्र याबाबत आरोग्य यंत्रणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रशासनानेही कुठलीच दखल घेवून संबधीत कर्मचाऱ्यांवर कारवाई केलेली नाही, त्यामूळे पाणी मुरतंय कुठं हाच सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. महत्त्वाचे म्हणजे नांदुरी - सप्तशृंगी घाटात तसेच वणी रस्त्यावर ही अनेकदा अपघात होत असतात.

Absence of medical officer in health center nashik news
Nashik Health Department : आरोग्य विभागाच्या खासगीकरणाचा श्रीगणेशा

परंतु अनेकदा याच आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी हजर राहत नसल्याने जखमींना तसेच प्रसुतीसाठी रात्री बेरात्री आलेल्या गर्भवती मातांना वणी किंवा नाशिकला उपचारासाठी न्यावे लागत असते. तसेच या आरोग्य केंद्रात कोणी उपस्थित राहात नसल्याने या ठिकाणी अनेकदा तळीरामांचाही कहर बघायला मिळतो.

मग हे तळीराम आरोग्य केंद्रातील कर्मचारीच आहेत की गावातील किंवा बाहेर गावचे आहेत का ? असा सवाल उपस्थित होतो. आता तरी संबंधित अधिकारी याकडे लक्ष देईल का हाच प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.

''आज सकाळी गावातील आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेलो असता तेथे आरोग्य अधिकारी व औषध निर्माण अधिकारीस नेहमी प्रमाणे हजर नसल्याने निदर्शनास आले. आरोग्य केंद्र गावात असून अडचण न नसून खोळंबा अशी गत ग्रामस्थ रुग्णांची झाली आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करुनही वरीष्ठांकडून कारवाई होत नाही याचे आश्चर्य आहे. त्यामूळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांसह वैद्यकिय अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीस पुष्पहार अर्पन केला आहे.'' - सरपंच सुभाष राऊत, नांदुरी

Absence of medical officer in health center nashik news
Health Care News: सकाळी उठल्याबरोबर 'ही' लक्षणे दिसली तर करू नका दुर्लक्ष, असतील हृदयविकाराची लक्षणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com