Jitendranath Maharaj
sakal
नाशिक: हक्काची जमीन पुन्हा मिळविण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश देत अर्जुनाला उभे केले. त्याचप्रमाणे आज बांगलादेश, पाकिस्तान, ब्रह्मदेश, भूतान, चीन हे भारताचे तुकडे परत घेण्यासाठी गीता शिकवून विद्यार्थी परिषदेला अर्जुनला उभे करावे लागतील. विद्यार्थ्यांना महाविद्यालयांतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र याविषयांसोबतच रामायण, गीतेचा अभ्यास करावा लागेल. महापुरुषांचे चरित्र वाचावे लागतील, असे प्रतिपादन अमरावतीतील देवनाथ पीठाचे पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज यांनी केले.