esakal | वणी-नाशिक रस्त्यावर थरार! एकमेकांवर आदळून तब्बल 9 वाहने अपघातग्रस्त
sakal

बोलून बातमी शोधा

vani accident

भीषण! एकमेकांवर आदळून नऊ वाहने अपघातग्रस्त

sakal_logo
By
दिगंबर पाटोळे

वणी (जि.नाशिक) : वणी-नाशिक रस्त्यावर (vani-nashik highway) एक ते दीड तासात वाहनांची घसरगुंडी होऊन नऊ वाहने अपघातग्रस्त झाली. आणि बघ्यांचा थरकाप उडाला...पाऊस येताच गाड्या घसरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र झोपलेल्या अवस्थेत आहे.(accident-vani-nashik-highway-marathi-news)

घसरगुंडी होऊन नऊ वाहने अपघातग्रस्त

गुरुवारी दुपारी साडेचार-पाचच्यादरम्यान पावसाच्या सरी कोसळताच दिंडोरी-नाशिक रस्त्यांवर रणतळे परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी सात वाहनांचा अपघात झाला. दिंडोरी-वणी रस्त्यावरील दिंडोरी डेली बाजाराजवळ दोन वाहनांचा अपघात झाला. ५ जूनलाही याच रणतळे ते सीडफॉर्म परिसरात असाच पाऊस झाल्यानंतर सहा वाहनांची घसरगुंडी होऊन अपघात झाला होता. रणतळे येथील उतार अपघातप्रवण क्षेत्र बनले असून, पाऊस होताच गाड्या घसरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र झोपलेल्या अवस्थेत आहे. वणी-नाशिक रस्त्यावर एक ते दीड तासात वाहनांची घसरगुंडी होऊन नऊ वाहने अपघातग्रस्त झाली. या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाले असून, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

रुंदीकरण व नूतनीकरणाचे काम

वणी-नाशिक मार्गावरील आक्राळे फाटा ते वणी, कळवण, नामपूर असा राज्य शासनाच्या हायब्रिड एन्युटी कार्यक्रमांतर्गत रस्त्याचे काम सुरू आहे. त्यात आक्राळे फाटा ते अहिवंतवाडी घाटाजवळच्या रस्त्यादरम्यान रुंदीकरण व नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. दिंडोरी शहर, वणी शहरातून जाणारे रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने सोडून दिले असून, ओझरखेड गावाजवळ अपूर्णावस्थेत आहे.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेत लहान मुलांचे आरोग्य जपा - आयुक्त कैलास जाधव

रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

महिनाभरात दोन ट्रक घसरून त्याखाली दोन चालक दबले गेले होते. त्यांना वाचविण्यात पोलिसांना यश आले होते. हा रस्ता काही ठिकाणी गुळगुळीत असून, त्यामुळे वाहने घसरत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. रस्ता दुभाजक पांढऱ्या व पिवळ्या रंगाचा पट्टा, वळणावरील पट्टा, तसेच गतिरोधकावर पांढरे पट्टे नसल्याने सातत्याने अपघात होत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दखल घेऊन अपघात रोखण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची तसेच दिंडोरी व वणी बसस्थानकासमोरील रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी वाहनचालक व नागरिक करीत आहेत.

हेही वाचा: नाशिकमध्ये आता दुसरा 'मॅग्नाइट मॅन'!बघण्यासाठी गर्दी