esakal | नाशिकमध्ये आता दुसरा 'मॅग्नेट मॅन'! बघण्यासाठी गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

magnet man

नाशिकमध्ये आता दुसरा 'मॅग्नेट मॅन'! बघण्यासाठी गर्दी

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : सिडकोपाठोपाठ अंबड परिसरातील एका ६१ वर्षीय कंपनीमालक व निमाच्या कमिटी मेंबरने कोव्हिशील्ड लशीचा दुसरा डोस घेऊन दोन महिने झाले असतानाही त्यांच्या अंगाला लोखंडी व स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा दावा केला असून, त्यांना बघण्यासाठी नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. (Crowd-in-Ambad-to-see-second-Magnet-Man-nashik-marathi-news)

दुसऱ्या "मॅग्नेट मॅन" ला बघण्यासाठी जमली बघ्यांची गर्दी

अंबडमधील महालक्ष्मीनगरमधील नानासाहेब देवरे (वय ६१) यांनी १० एप्रिलला कोव्हिशील्ड लशीचा दुसरा डोस घेतला. तब्बल दोन महिन्यांनंतर आता १० जूनला त्यांच्या शरीरावर लोखंडी वस्तू चिकटत असल्याचे दिसून आले. कंपनीत बसलेले असतानाच त्यांनी हा प्रयोग करून बघितला. कामगारांच्या जेवणाचे डबे, चमचे व कॉइन लावून बघितले तर खरोखर हाताला, छातीला, पाठीला, कपाळाला व गालालाही या सर्व वस्तू चिकटल्याने सर्व जण आश्चर्यचकित झाले. त्यामुळे कामगारांमध्ये एकच चर्चा रंगली. त्यानंतर ते घरी आले. घरी हा प्रयोग कुटुंबासोबत केला, तर खरोखर सर्व वस्तू चिकटत होत्या. याबाबत परिसरात एकच चर्चा रंगली. परिसरातील लोकही तो प्रयोग बघण्यासाठी गर्दी करू लागले.

हेही वाचा: VIDEO: लोखंड चिकटण्याच्या दाव्याची 'अंनिस'कडून पोलखोल

हेही वाचा: लासलगाव बाजार समितीत ऐतिहासिक पंरपरा मोडित