esakal | खबरदार! अकरावाजेनंतर दुकान सुरु ठेवाल तर भरावा लागेल दंड
sakal

बोलून बातमी शोधा

Punitive action against shopkeepers for breaking the rules

खबरदार! अकरा वाजेनंतर दुकान सुरु ठेवाल पडेल महागात

sakal_logo
By
दत्ता जाधव

नाशिक : कोविडचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने व्यावसायिकांसाठी वेळेची निश्‍चिती केली आहे. मात्र त्यानंतरही व्यवसाय सुरूच ठेवणाऱ्या बाजार समिती परिसरातील पंचवटी पोलिसांनी पाच व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून प्रत्येकी पाच असा २५ हजार रुपये दंड वसूल केला. (action against shopkeepers for breaking the rules)

नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने कडक लॉकडाउन (lockdown) केले असून, व्यावसायिकांना सकाळी सात ते अकरादरम्यानच व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्यानंतर व्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांकडून पाच हजार रुपये असा दंड करण्यात येत आहे. वारंवार आवाहन करूनही काही व्यावसायिक प्रशासनाला दाद देत नसल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता. ३) ही कारवाई करण्यात आली. त्यात पंचवटी शनिमंदिरासमोरील जयभवानी सीड्‌स, मखमलाबाद नाक्यावरील ललवाणी कृषी एजन्सी, बाजार समितीजवळील अभिषेक शेती उद्योग भांडार, ओमकार ॲग्रोटेक व महावीर ट्रेडर्स या दुकानांवर प्रत्येकी पाच हजार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

हेही वाचा: 18 दिवसांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या

''व्यावसायिकांसह प्रत्येकाने कोविडविषयक नियमांचे काटेकोर पालन करावे. नियमांचे पालन न करता कोणत्याही आस्थापना सुरू ठेवल्यास आस्थापना सील करण्यात येतील. तसेच दंडात्मक कारवाईही नियमित सुरूच राहील.''

-अशोक भगत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पंचवटी, नाशिक.

हेही वाचा: रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा वापर शक्यतो टाळा : पालकमंत्री छगन भुजबळ

loading image
go to top