esakal | रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा वापर शक्यतो टाळा : पालकमंत्री छगन भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

chhgan bhujbal

रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा वापर शक्यतो टाळा : पालकमंत्री छगन भुजबळ

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : नामको (Namco) चॅरिटेबल ट्रस्टने दहा दिवसांत नामको रुग्णालयात केअर सेंटरची सुरवात करण्यात आली, हे कौतुकास्पद आहे. नामको रुग्णालय संचलित आरएमडी (RMD) कोरोना केअर सेंटरचे उद्‍घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. (The RMD Corona Care Center run by Namco was inaugurated by the Guardian Minister Chhagan Bhujbal)

आवश्यक ती औषधे डॉक्टरांनी द्यावीत

कोरोनाचा रुग्ण बरा होण्यासाठी आवश्यक ती औषधे डॉक्टरांनी द्यावीत, रेमडेसिव्हिर (Remdesivir) इंजेक्शनचा वापर आवश्यक असेल, तरच करावा शक्यतो. या इंजेक्शनचा वापर टाळण्यात यावा, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी (ता. ३) येथे सांगितले. भुजबळ म्हणाले, की गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने रुग्णसंख्या वाढली असल्याने औषधे व ऑक्सिजनचा (Oxygen) मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र तरीदेखील आवश्यक त्या सोयी-सुविधा सरकार, प्रशासन व सेवाभावी संस्थांतर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शहर व जिल्ह्यात खाटांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. ऑक्सिजनचा साठा मुबलक प्रमाणात ठेवून कोरोना केअर सेंटरचे काम सुरू ठेवावे.

हेही वाचा: "पराभव पचवायची सवय लावून घ्या…", भुजबळांंचा चंद्रकांत पाटलांंना सल्ला

नामको कोरोना सेंटरमधील सुविधा

० आठ बायपॅप(B-PAP) व्हेंटिलेटरसह आठ खाटांचा अतिदक्षता विभाग

० ऑक्सिजन सुविधेसह ४२ खाटांची उपलब्धता

० प्रत्येक वॉर्डमध्ये करमणुकीसाठी दूरचित्रवाणीसंच (TV), वाय-फाय (WIFI), दूरध्वनी (TELEPHONE), पिण्याचे गरम व थंड पाणी

० तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, आरोग्यदायी आहार आणि तेही सरकारी दरात रुग्णसेवा

हेही वाचा: VIDEO : नाशिकमध्ये 'म्‍युकोरमायकोसिस'चे नवे संकट; मधूमेह बाधितांना सावधगिरीचा इशारा

या नेत्यांची होती उपस्थिती

आमदार दिलीप बनकर, नामको संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, सचिव शशिकांत पारख, माजी आमदार वसंत गिते, विजय साने, हेमंत धात्रक, अशोक साखला, महेश लोढा, चंद्रकांत पारख, प्रकाश दायमा, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, रंजन ठाकरे, राजेंद्र डोखळे, जयप्रकाश जातेगावकर आदी उपस्थित होते.

बनकर म्हणाले, की नामको चॅरिटेबल रुग्णालय व बँकेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे सामाजिक कार्य अविरतपणे सुरू आहे. कोरोनाच्या काळात ऑक्सिजनबाबत योग्य ते सहकार्य करण्यात येईल.

loading image