esakal | ऑडिट न करणाऱ्या रुग्णालयावर होणार कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

hospital

ऑडिट न करणाऱ्या रुग्णालयावर होणार कारवाई

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील (zakir hussain hospital) दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांचे इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल व फायर ऑडिट (audit) करून घेण्याच्या सूचना दिल्यानंतरही रुग्णालयाकडून टाळाटाळ केली जात असल्याने सर्व रुग्णालये व कोविड सेंटरला नोटीस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Action taken against hospital not conduct audit)

सूचना दिल्यानंतरही रुग्णालयाकडून टाळाटाळ

२१ एप्रिलला महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २४ रुग्णांचा हकनाक बळी गेला. त्यानंतर काही तासांतच विरार येथील एका खासगी रुग्णालयाला आग लागून तेथेही रुग्णांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इलेक्ट्रिकल व फायर ऑडिट करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यापूर्वी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनीदेखील शहरातील सर्व १७८ कोविड रुग्णालयांना खासगी रुग्णालयांचे इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल व फायर ऑडिट करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. ऑडिट करण्यासाठी महापालिकेने खासगी संस्थेची नेमणूक केली. मात्र खासगी रुग्णालयाकडून ऑडिटला प्रतिसाद मिळत नाही.

हेही वाचा: नाशिकमध्ये ‘टॉसिलिझुब’ इंजेक्शनचा काळा बाजार! फार्मसीचे 2 विद्यार्थी ताब्यात

दुर्घटना घडल्यास जीवित व वित्तहानी होण्याची मोठी शक्यता

रुग्णालयाकडून टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ऑडिट न झाल्यास दुर्घटना घडल्यास जीवित व वित्तहानी होण्याची मोठी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त जाधव यांनी ऑडिटच्या सूचना दिल्या आहेत. ज्या रुग्णालयाकडून सूचनांचे पालन होणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा: धक्कादायक! चांदवडला रेमडेसिव्हिर ऐवजी भुलेच्या इंजेक्शनची विक्री