
Nashik Crime News : अनधिकृत गावठी हातभट्टीवर मुल्हेर परिसरात कारवाई!
अंबासन (जि. नाशिक) : जायखेडा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुल्हेर आउटपोस्टच्या हद्दीत जायखेडा पोलिसांनी नववर्षाच्या सुरवातीलाच छुप्या पद्धतीने एका नाल्यात अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर धडक कारवाई करीत ३८ हजार सातशे रुपयांचा ऐवज जप्त करून संशयितास अटक केली आहे. (Action taken on unauthorized village furnaces in Mulher area Nashik Crime News)
जायखेडा पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सोमवारी (ता. २) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुल्हेर आउटपोस्टच्या शिवारातील हॉटेल नक्षत्रपासून काही अंतरावर असलेल्या नाल्यामध्ये संशयित संदीप उखा बागूल (वय २६, रा. मुल्हेर) हा अवैधरीत्या गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठीच्या कच्च्या रसायनाचा साठा, तसेच अन्य साधनसामग्रीसह गावठी हातभट्टीची दारू गाळताना आढळला.
त्याच्या ताब्यातील अकरा हजार पाचशे रुपये किमतीचे २०० लिटर मापाचे एक लोखंडी बॅरल, बॅरलमध्ये अंदाजे १५० लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन भरलेले, कच्च्या रसायनाची अंदाजे किंमत ७० रुपये प्रतिलिटर व प्रत्येक बॅरलची अंदाजे किंमत एक हजार रुपये, तसेच अन्य २६ हजार दोनशे रुपये किमतीचे २०० लिटर मापाचे दोन प्लॅस्टिकचे बॅरल,
हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक
हेही वाचा: Nandurbar Police News : कुडकुडणाऱ्या निराधारांना खाकीची ऊब
बॅरलमध्ये अंदाजे १८० लिटर कच्चे रसायन भरलेले, कच्च्या रसायनाची अंदाजे किंमत ७० रुपये प्रतिलिटर व प्रत्येक बॅरलची अंदाजे किंमत पाचशे रुपये, तसेच गावठी हातभट्टीची दारू बनवण्याची सामग्री यात, एक हजार रुपये किमतीचे १० लिटर मापाच्या प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये असलेली पाच लिटर तयार गावठी हातभट्टीवरील दारू असे एकूण ३८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक शहाजी उमाप व जायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, पोलिस नाईक योगेश क्षीरसागर, उमेश भदाने, पृथ्वीराज बारगळ यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा: Yeola Water Scarcity : येवला शहराला 4 दिवसाआड पाणीपुरवठा!