Nashik Police Transfers : शर्मिष्ठा वालावलकर यांच्या बदलीला मिळाला ‘Red Signal’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharmistha Walawalkar

Nashik Police Transfers : शर्मिष्ठा वालावलकर यांच्या बदलीला मिळाला ‘Red Signal’

नाशिक : पोलिस अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या बदल्यांमागील ग्रहण काही सुटेनाचे चित्र आहे. राज्यातील १०४ आयपीएस व महाराष्ट्र पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना २४ तास उलटत नाही तोच यातील ९ अधिकाऱ्यांना कार्यमुक्त न करण्याचे आदेश अपर पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी दिले आहेत.

यात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदी बदली झालेल्या शर्मिष्ठा वालावलकर-घार्गे यांचाही समावेश आहे. बदल्या रोखण्याचे नेमके कारण समोर आलेले नाही, त्यामुळे पोलिस वर्तुळातच उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. (Additional DGP Sanjeev Kumar Singhal Orders not to dismiss nine officers Sharmistha Walawalkar transfer received Red Signal Nashik news)

हेही वाचा: Nashik : अबबं...35 प्रवांशाचा जीव धोक्यात घालुन मागच्या 3 चाकांवर धावली लालपरी!

राज्याच्या गृह विभागाने सोमवारी (ता. ७) रात्री गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या राज्यातील पोलिस अधीक्षक दर्जाच्या आयपीएस-मपोसे (महाराष्ट्र पोलिस सेवा) दर्जाच्या १०४ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना हिरवा कंदील दाखविला. मात्र या बदल्यांना २४ तासांचा कालावधी उलटत नाही तोच यातील ९ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या रोखण्यात आल्या आहेत.

राज्याचे अपर पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी १०४ पैकी ९ अधिकाऱ्यांना कार्यमुक्त न करण्याचे आदेश दिले आहेत. यात राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्त शर्मिष्ठा वालावलकर-घार्गे यांची नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. बदल्या रोखण्यात आलेल्या नऊ अधिकाऱ्यांत त्यांचाही समावेश आहे.

बदली झालेल्या १०४ अधिकाऱ्यांतील प्रशांत मोहिते, नम्रता पाटील, संदीप डोईफोडे, दीपक देवराज, सुनील लोखंडे, प्रकाश गायकवाड, तिरुपती काकडे, योगेश चव्हाण व शर्मिष्ठा वालावलकर यांना वगळून इतर ९५ अधिकाऱ्यांना त्यांच्या नियंत्रक अधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यमुक्त करून नवीन ठिकाणचा पदभार घेण्याचे आदेश सिंघल यांनी बजावले आहेत. आदेश काढताना नियंत्रक अधिकाऱ्यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण व न्यायालयाच्या आदेश, आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्यास कळविले आहे.

हेही वाचा: Fake Currency Crime : पुन्हा 500ची बनावट नोट देऊन फसवणूक!

टॅग्स :NashikpoliceDGPTransfers