Adhartirtha Ashram Crime : आधारतीर्थच्या पदाधिकाऱ्यावर ‘बालविकास’तर्फे गुन्‍हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Adhartirtha Ashram Crime : आधारतीर्थच्या पदाधिकाऱ्यावर ‘बालविकास’तर्फे गुन्‍हा दाखल

नाशिक : त्र्यंबकेश्वर नजीक असलेल्‍या आधारतीर्थ आश्रमाला शासनाच्‍या महिला व बालविकास विभागाची मान्‍यताच नसल्‍याची गंभीर बाब निदर्शनात आली होती. यासंदर्भात 'सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. मंगळवारी (ता.६) जिल्‍हा व बालविकास विभागाचे अधिकारी अजय फडोळ यांनी त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. (Adhartirtha Ashram Crime case filed against office bearer of Adhartirtha by Balvikas nashik news)

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

हेही वाचा: Dhule News : आयुक्तांसह अधिकारी सायकलवर!; माझी वसुंधरा अभियानांतर्गत धुळ्यात पुन्हा उपक्रम सुरू

आधारतीर्थ आश्रमासंदर्भात अनेक तक्रारी बालकल्याण समितीला प्राप्त झालेल्‍या होत्‍या. त्‍यामुळे काही वर्षांपूर्वीच समितीने आश्रमाची मान्यता रद्द केली होती. असे असतांनाही आधारतीर्थ आश्रम राजेरोसपणे सुरू होता. श्री. फडोळ यांनी त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्यात आज याबाबत फिर्याद दिलेली आहे.

विभागाची कुठल्‍याही परवानगी न घेता आश्रम सुरू ठेवल्‍याबाबत ही फिर्याद दाखल केलेली आहे. दरम्‍यान या प्रकरणाचा तपास त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे करत आहेत. त्‍यामुळे बेकायदेशीररीत्या आश्रम चालविणाऱ्या पदाधिकाऱ्यावर आगामी काळात कायदेशीर कारवाई होण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा: Rajya Natya Spardha : अंदरसुलच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद प्रयत्न ‘फ्रिडम 75’