Navratri Festival
sakal
वणी: आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या आदिमाया सप्तशृंगगडावर वर्षातील दोन प्रमुख यात्रोत्सवांपैकी एक असलेला नवरात्रोत्सव आठ दिवसांवर येऊन ठेपला. त्यादृष्टीने गडावर तयारी सुरू झाली आहे. नवरात्रोत्सव केवळ आध्यात्मिक चिंतन आणि उत्सवाचा काळ नाही तर व्यवसायांसाठी बाजारपेठेत चमकण्याची सुवर्णसंधी देखील आहे. नवरात्रीच्या नऊ रात्री ज्याप्रमाणे भक्ती आणि समर्पणाने भरलेल्या असतात, तशाच त्या व्यवसायाची भरभराट करणाऱ्या ठरतात.