नाशिक: आदिवासी आश्रमशाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन १८ व्या दिवशीही भरपावसात सुरूच आहे. शासनाकडून आंदोलनाची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने येत्या सोमवार (ता. २८)पासून आंदोलनाची रणनीती बदलण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. याबाबत कोअर कमिटीच्या बैठकीनंतर निर्णय घेतला जाणार असल्याचेही विश्वसनीय सूत्रांकडून समजते.